♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस आठवा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस आठवा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

चित्रातील व्यक्ती कोण आहे ? तिचे काम आपल्याला जाणून घ्यायचे आहे या मुद्द्याचा विचार करून प्रश्न तयार करण्यास सांगतात…

+ कल्पक होऊ या.

१) तुमच्या परिसरातील एखाद्या कारागिराची माहिती मिळविण्यासाठी प्रश्न तयार करा.

२) तुमच्या परिसरातील रिक्षाचालक, एस. टी चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी १० प्रश्न तयार करा.

 विषय –  गणित 

प्रश्न 1) 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या लिही.

प्रश्न 2) 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ते शोधून लिही.

> सराव कोपरा – प्रश्न 1) दिलेल्या संख्यांमधील मूळ संख्येला गोल कर.

24, 31, 49, 12, 23, 48, 59, 74, 79,10,91

प्रश्न 2) खालील जोड्यांमधील सहमूळ संख्या आहेत की नाही हे ठरव.

14; 21

13; 17

10; 30

50; 52

15:16

 विषय –  इंग्रजी 

विषय – परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 08

समजून घेऊ या : शेतीचे सुधारित तंत्रज्ञान, पिकांचे संरक्षण संदर्भ : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक -12 (सर्वासाठी अन्न)

अध्ययन निष्पत्ती : आपल्या दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा वापर व मूलभूत गरजा भागविण्याची (पाणी, अन्न इ.) प्रक्रिया स्पष्ट करतात दैनंदिन जीवनातील विविध संस्थांची भूमिका व कार्य स्पष्ट करतात (बँक पंचायत सहकारी संस्था पोलीस स्टेशन इ.)

 विषय –  परिसर अभ्यास  

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१. शक्तिमान मानवाने थंडीपासून स्वतःचे संरक्षण कसे केले?

२. मानवाने कोणत्या लहान प्राण्यांची शिकार केली?

३. तात्पुरत्या वस्तीत बुद्धिमान मानव कोणते काम करत?

४. तात्पुरत्या वस्तीत बुद्धिमान मानव कोणते निरीक्षण करत?

५. नवाश्मयुगात मानवाला शिकारीची गरज का राहिली नाही?

६. मानव एके ठिकाणी मुक्काम का करू लागला?

अधिक सराव करू –

१. मॅमोथसारखे महाकाय प्राणी कसे नष्ट झाले?

२. मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहारात बदल का झाला? 

३. बुद्धिमान मानवाने मोठ्या प्रमाणावर मासेमारी का सुरु केली?

४. मध्याश्मयुगीन हंगामी तळ व नवाश्मयुगीन गाव वसाहत या दोन्ही कल्पनाचित्रांचे निरीक्षण कर मानवी जीवनात कोणते बदल झाले आहेत ते लिही.