♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस चौथा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस चौथा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

उत्तर:- ……………………………………………………………………

शिक्षकांनी मुलांना खालील उताऱ्यांचे ठराविक वेळेत वाचन करण्यास सांगावे. समजपूर्वक वाचन झाले कि नाही हे तपासण्यासाठी उताऱ्यावर आधारित काही प्रश्न विचारावेत शिक्षक विद्यार्थी वाचन करत असताना पुढील मुद्यांच्या आधारे निरीक्षण करतील.

१) आवाजातील बदल ( चढ – उतार ) २) विरामचिन्हाचा विचार करून वाचन

३) चेहऱ्यावरील हावभाव ४) पुस्तक पकडण्याची पध्दत ५) शब्दांचा शुद्ध व स्पष्ट उच्चार

+ सक्षम बनू या

शिक्षकांनी मुलांच्या प्रकटवाचनाचे निरीक्षण केल्यानंतर वरील उताऱ्याचे आदर्श प्रकटवाचन करून दाखवावे आदर्श प्रकटवाचन कसे असावे याबाबत चर्चा करावी उता-यात आलेल्या विरामचिन्हांचा अर्थ सांगावे. त्यानुसार अर्थपूर्ण वाचन कसे करावे हे सांगतील. शिक्षकांनी वरीलप्रमाणे विविध उतारे वाचनास उपलब्ध करून द्यावेत.

+ सराव करू या

१. इ. ४ थीच्या पाठ्यपुस्तकातील पान नं. २ वरील पाठ २ बोलणारी नदी या पाठाचे प्रकटवाचन करून घ्यावे व त्यावर आधारित प्रश्न विचारावेत

२. विरामचिन्ह असलेले उतारे किंवा गोष्टींची पुस्तके देऊन प्रकटवाचनाचा सराव करून घ्यावा. 

३. पुढील शब्द मोठ्याने वाचण्यास सांगावे . आशीर्वाद अभयारण्य स्फूर्ती, आत्मभान, सत्याग्रह, स्वयंपाक, ख्रिसमस, सर्वत्र, ग्लास, वल्हवा

कल्पक होऊ या

१) गटामध्ये उपलब्ध असलेली वर्तमानपत्रातील निवडक उतारे प्रकट वाचनास द्यावेत.

२) इ.४ थी च्या पाठ्यपुस्तकातील पान नं – ६४ वरील उतारा

वाचण्यास द्यावा. योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून लिहिण्यास सांगावे.

३) आवाजात चढ उतार असलेली वाक्य शोधण्यास सांगावी. उदा. “ योग्य भाव ? पाच पैसे लागतील. घ्यायचं असेल तर घे नाहीतर चालू लाग.

 विषय –  गणित 

थोडे आठवूया

आपण चार व पाच अंकी संख्येचे वाचन करायला शिकलो आहोत. ८४०८ ही संख्या आपण आठ हजार चारशे आठ अशी वाचतो. चला तर मग पुढील काही संख्याचे वाचन करूया व अक्षरात लिहूया.

दिलेल्या संख्या वाच व अक्षरात लिही.

 विषय –  इंग्रजी 

विषय – परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 04

संदर्भ : इयत्ता चौथी प्रकरण 4 पिण्याचे पाणी

सराव करु या:

प्र. 1) पाणी पारदर्शक दिसत असले तरी ते पिण्यायोग्य असेलच असे नाही, याचे कारण काय?

प्र. 2) जरा डोके चालवा.

अ) पाण्यात साखर लवकर विरघळण्यासाठी काय करावे लागेल?

आ) रवा आणि साबुदाणा एकत्र झाले आहेत ते वेगळे करायचे आहेत. कसे कराल?

प्र. 3) पावसाळ्यात नळाला पिण्याचे पाणी गढूळ आले तर ते पिण्यायोग्य कसे कराल?

प्र. 4) खालील वस्तूंचे वर्गीकरण करा व तक्ता पूर्ण करा. ( दगड, साखर, लाकूड, पेन, खिळा, मीठ, तेल)

 विषय –  परिसर अभ्यास  

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(अ) चक्रधर स्वामींनी………… हा ग्रंथ लिहिला.

आ) ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ……………..यांनी केली

इ) भारुडे हा लोकगीताचा प्रकार………………… यांनी लिहिला.

ई) संत रामदासांनी………………………… हा ग्रंथ लिहिला.

उ) “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा” हा संदेश………………. यांनी दिला.

संतांची कामगिरी :- हा पाठ्यांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग -२) या पाठ्यपुस्तकात पान क्र. ३ ते ६ वर आहे उपक्रम : स्त्री संतांची माहिती मिळवा व त्यांची नावे वहीत लिहा.

अधिक सराव करू : तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका संतांची माहिती थोडक्यात लिहा.

उत्तर : – ………………………………………………………..