♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस सतरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस सतरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

शिक्षकांनी वरील शब्द विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यावे. या शब्दांत कोणता प्रत्यय लावला आहे ते शिक्षकांनी स्पष्ट करावा. प्रत्यय म्हणजे काय व प्रत्यय शब्दाला कोठे जोडतात ते शिक्षकांनी उदाहरणे देऊन स्पष्ट करावे . याप्रमाणे आणखी उदाहरणे घेऊन ते शब्द विद्यार्थ्यांकडून गटात किंवा वैयक्तिकरित्या नवीन शब्द तयार करुन घ्यावे. उदा, अन्याय अन्यायकारक

शिक्षकांनी प्रत्यय न लावता व प्रत्यय लावून झालेल्या शब्दांचा वाक्यात कसा उपयोग होतो ते प्रत्यक्ष दाखवावे. दोन्ही वाक्याच्या अर्थामध्ये झालेल्या बदलाविषयी विद्यार्थांशी चर्चा करावी किंवा झालेला बदल विद्यार्थांच्या निदर्शनास आणून द्यावा.

 विषय –  गणित 

* एका खेपेला ४ विद्यार्थी याप्रमाणे ४२ विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी रिक्षाला किती फेऱ्या माराव्या लागतील ?

• विजयजवळ १०० रुपयाच्या ३ नोटा, १० रुपयाच्या ९ नोटा व १ रुपयाची ६ नाणी असे ३९६ रुपये आहेत. तर सीमा, परी व हीना यांच्यामध्ये ते सारखे कसे वाटता येतील ?

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 17

संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 17, माझी जडणघडण

अध्ययन निष्पत्ती: कुटुंब/ शाळा / शेजार या ठिकाणी निरीक्षण केलेल्या / अनुभवलेल्या समस्यांवर स्वतःचे मत मांडतात. (उदा. साचेबद्धपणा/ भेदभाव / बालहक्क)

लक्षात घेऊया :

लहानाचे मोठे होताना आपण अनेक छोट्या-मोठया गोष्टी शिकत जातो. त्यातून आपल्या सवयी घडत जातात. आपल्या आवडीनिवडी ठरत जातात. हळूहळू आपले विचार पक्के होऊ लागतात. यालाच आपली जडणघडण होणे’ असे म्हणतात.

वरील चित्रांचे निरीक्षण करा.

हे प्रसंग सर्वांच्या घरात तसेच आजूबाजूला आपण बाहेर वावरताना होत असतात. यातूनच आपण चांगले संस्कार शिकत जातो; यासाठी घरातील वातावरण व सभोवतालचे व्यक्ती जे करतात त्यांच्या अनुकरणातून आपण संस्कार आणि खूप काही नवीन गोष्टी शिकत असतो. वरील तिन्ही चित्रांमध्ये कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, शेजारी असे अनेक लोक दिसत आहेत त्यांच्याकडूनही आपल्याला खूप काही शिकायला मिळते.

अवतीभवती बघून आपण अनेक गोष्टी शिकत असतो. आपल्या मित्रमैत्रिणी कशा बोलतात? कोणते कपडे घालतात? कोणते खेळ खेळतात? अभ्यास कसा करतात? हे अनेकदा आपण नकळतपणे शिकतो. बऱ्याचदा शेजाऱ्यांनी आपल्याला लहानपणापासून पाहिलेले असते. आपल्याविषयी त्यांना जिव्हाळा असतो. शेजाऱ्यांमुळे आपल्याला चांगल्या सवयी लागू शकतात. चांगला शेजार आपल्या जडणघडणीत महत्वाचा असतो.

सराव करू या :

प्र. 1) तुम्हाला येणाऱ्या प्रार्थनेच्या चार ओळी लिहा.

प्र. 2) गटाने खेळल्या जाणाऱ्या खेळांची नावे लिहा.

प्र. 3) काय कराल ते लिहा. (अ) शाळेत जाताना तुमचा मित्र पाय घसरून चिखलात पडला.

ब) बागेत दोन लहान मुलांचे भांडण सुरू आहे.

क) मांजराचा पाय गटारावरील जाळीत अडकला आहे.

प्र. 4) तुम्हाला माहीत असणाऱ्या तुमच्या एका शेजाऱ्यांची पुढील माहिती मिळवा व वहीत लिहा.

अ) शेजाऱ्यांचे आडनाव काय आहे?

ब) शेजारी बोलली जाणारी भाषा कोणती?

क) त्यांच्या कुटुंबात किती माणसे आहेत ?

ड) त्यांच्याकडे बनवला जाणारा तुमच्या आवडीचा एक पदार्थ कोणता?

इ) शेजाऱ्यांकडे कोणकोणती झाडे, रोपे आहेत त्यांची नावे लिहा.

 विषय –  परिसर अभ्यास  

१) तानाजी मालुसरे यांचे गाव कोणते ?

२) आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे असे कोण म्हणाले ?

३ ) कोंढाणा किल्याचा किल्लेदार कोण होता?

आहे.

गड आला, पण सिंह गेला:- हा पाठ्यांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग -२) या पाठ्यपुस्तकात पान क्र. ५५ वर

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१) तानाजीच्या भावाचे नाव काय होते?

२) सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला?

३)शिवराय हळहळून काय म्हणाले?

उपक्रम- तुझ्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची यादी कर.