♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस सतरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस सतरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊया

• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परिचित शब्द सांगून त्याशब्दाचे लिंग ओळखण्यास

प्रोत्साहित करावे.

जसे – वही – स्त्रीलिंग, झाड – नपुसंकलिंग, फळा – पुल्लिंग, वही – एकवचन, वह्या

अनेकवचन

शिक्षकांनी फळ्यावर काही शब्द लिहून त्यांचे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या गटात वर्गीकरण करण्याची कृती घ्यावी.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परिचित शब्द सांगून त्याचे वचन ओळखण्यास प्रोत्साहित

करावे.

जसे- वही, पुस्तक, फुला

शिक्षकांनी फळ्यावर काही शब्द लिहून विद्यार्थ्यांना त्यांचे वर्गीकरण एकवचन व अनेकवचन रकान्यात करण्यास सांगावे.

+ सक्षम बनू या..

शिक्षकांनी पुल्लिंग अथवा स्त्रीलिंग शब्द देऊन त्याच्याशी संबंधित भिन्न लिंगी शब्द सांगण्यास प्रवृत्त करावे. जसे – आजी – आजोबा, मोर-लांडोर, आई – वडील

• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लिंग कसे ओळखावे याबाबत चर्चा करावी.

• एकवचन व अनेकवचन यांच्यातील फरक समजण्यासाठी प्रात्यक्षिक कृती घेण्यात

यावी.

जसे – एक खुर्ची, अनेक खुर्च्या

एक मुलगा, अनेक मुले.

सराव करू या..

शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गट करून एकवचन व अनेकवचन सांगणे यासाठी खेळ

घ्यावा.

• अवांतर परिच्छेद देऊन त्यामधील शब्दांचे लिंग ओळखण्याचा सराव करावा.

• दोन- दोन विद्यार्थ्यांचे गट बनवून लिंग ओळखा व वचन ओळखा खेळ आपापसांत खेळण्यास प्रोत्साहित करावे.

+ कल्पक होऊ या..

एकच शब्द एकवचन व बहूवचनात आहे असे शब्द शोधून त्यांचा संग्रह करा.

लिंगविचार व वचनविचार यांचा समावेश करून शब्दकोडी बनविण्याचा प्रयत्न करावा.

 विषय –  गणित 

संबोध कोपरा

दररोज आपण कितीतरी वस्तू मोजतो / मापतो म्हणजेच आपण निश्चित केलेल्या एककाच्या सहाय्याने त्यांची तुलना करतो आणि ते त्या ठरवलेल्या एककाच्या तुलनेत किती आहे निश्चित करून सांगतो, जसे- १० आंबे आणले, म्हणजे एका आंब्यासारखे दहा आंबे; टाकीत ५ घागरी पाणी भरले, म्हणजे एका घागरीसारख्या पाच घागरी पाणी किंवा एक घागर पाणी पाच वेळा; 3 मीटर दोरी आणली, म्हणजे एक मीटर पट्टी एवढ्या लांबीच्या तुलनेत तीन वेळा भरेल एवढी दोरी; ७ किलोग्रॅम गहू दळून आणले, म्हणजेच एक किलोग्रॅम वजनाएवढे सात वेळा भरतील एवढे गहू.

दोन्ही बाजूला समान वजन आहे म्हणून वजनकाट्याची सुई मध्ये आहे.

 विषय –  इंग्रजी 

Learning Activity/Experience:-Listen and repeat.

Three little kittens

Lost their mittens,.

And they began to cry,

Kittens: Oh mother dear,

We very much fear,

We have lost our mittens! Oh my!

The cat: You naughty kittens,

Lost your mittens,

Then you shall have no pie.

Kittens: Mioow, mioow, mioow

The cat: No you shall have no pic.

Kittens: Mioow, mioow, mioow

4. Solved Activity/Demo:

Students sings action songs.

5. Practice:

Students watch more videos and understand the meaning of songs 6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

Students sing action song and watch more videos of songs.

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 17

• समजून घेऊ या : अन्न पदार्थातील विविधता. संदर्भ : इयत्ता- 3 री, पाठ 13 आपला आहार.

अध्ययन निष्पत्ती : विविध वयोगटातील लोकांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील, घरातील पाण्याच्या उपयोगाच्या वर्णन करू शकतो.

लक्षात घेऊया :

निरनिराळ्या लोकांच्या आहारांत निरनिराळे अन्नपदार्थ असतात. एका घरात रोज ठरावीकच पदार्थ बनवले गेले, तर तेच अन्नपदार्थ सतत खावे लागतील. जेवण कंटाळवाणे होईल म्हणून अन्नपदार्थ आलटून पालटून करतात.. परिसरात जे धान्य जास्त प्रमाणात पिकते, तोच तेथील लोकांचा मुख्य आहार असतो. उदा. कोकणात तांदूळ जास्त • पिकतो आणि समुद्रात मासळी सहज मिळत असल्याने तेथील लोकांच्या आहारात भात आणि मासळी जास्त असते.

सराव करु या:

1. खाली दिलेला मुख्य आहार आणि प्रदेश यांच्या योग्य जोड्या लावा.

 विषय –  परिसर अभ्यास  

करून पाहूयात –

१. कोणकोणत्या कामात तुला घरच्यांची मदत लागते त्यांची यादी कर.

२. कोणत्या कामात तुला मित्रांची मदत लागते त्यांची यादी कर.

आवश्यक साहित्य-

विविध खेळांची चित्र

अध्ययन अनुभव –

आपण आपल्या मित्रांसोबत अनेक सामुहिक कामे करतो, हि कामे सहकार्याशिवाय पूर्ण होत नाहीत. 

१. एकट्याने विद्यालयाची स्वच्छता करा. काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले? काय शिकण्यास मिळाले ते लिहा

२. समूहाने विद्यालयाची स्वच्छता करा.

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१. समूहात किती व्यक्ती असतात?

२. सहकार्यामुळे कोणते फायदे होतात?

३. समूहात काम केल्याने आपला विकास होतो का?