♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सतरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सतरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

सक्षम बनू या

> शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कवितेस विविध चाली लावण्याचा प्रयत्न करायला

सांगावे.

> कवितेत आलेले नादमय शब्द शोधण्यास सांगावे.

> पद्यवाचन आणि गदयवाचन यात काय फरक आहे ते कविता गायन घेऊन

विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्यावे.

१) मोबाईलमध्ये कविता ऐकवणे.

२) YouTube वर कविता ऐकवणे.

सराव करू या

. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून कविता गटात/वैयक्तिक रित्या तालासुरात, साभिनय म्हणण्याचा सराव घ्यावा.

विविध कविता, बालगीते ऐकण्याची संधी द्यावी.

• कवितांचे कृतिसह गायन घ्यावे.

कवितेतील यमक जुळणारे शब्द, नादमयशब्द यांचे वाचन घ्यावे.

• कवितेचे लयीत, तालात, टाळ्या वाजवून वाचन करून घ्यावे.

> कल्पक होऊ या.

विद्यार्थ्यांनी पुढील कृती कराव्यात.

पाठ्यपुस्तकात आलेल्या कवितांना वेगवेगळ्या चाली लावा. त्यांचे वर्गात सादरीकरण करा.

• तुला आवडणारे बालगीत कृतीसह वर्गात सादर कर.

• वर्गात असणारी कवितांची पुस्तके बघ, आवडीची कविता वाच, कवितेला चाल लावण्याचा प्रयत्न कर, मित्रमैत्रिणींना कविता गाऊन दाखव..

• यमक जुळणारे शब्द लिही व ते वापरून कविता तयार कर.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : १७

वाहतुकीची साधने

समजून घेऊ या : वाहतुकीची साधने, वाहतुकीचे नियम.

संदर्भ : वाहने, इयत्ता दुसरीच्या ‘खेळू, करू, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील क्र.७९) अध्ययन निष्पत्ती : वाहतुकीचे नियम समजून घेतो.

सराव करू या :

१) एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जातो?