पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस पंधरा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
+ जाणून घेऊ या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वरचिन्हयुक्त शब्दांचे /वाक्यांचे श्रुतलेखन द्यावे.
उदा. पिशवी, पेशवाई, कैवारी, सौरभ इ.
आम्ही शाळेत वृक्षारोपण केले.
वरील शब्दांचे/वाक्यांचे लेखन करून घेऊन ते तपासतात व चुकीचे शब्द दुरुस्त करून पुन्हा
लिहिण्यास
सांगावे
+ सक्षम बनू या
शिक्षकांनी श्रुतलेखनाचे नियम समजून सांगताना हस्व दीर्घ उच्चार असलेल्या शब्दांचे श्रुतलेखन कसे करतात हे उदाहरणासह समजावून द्यावे. श्रुतलेखन करताना पूर्णविराम स्वल्पविराम,प्रश्नचिन्ह इत्यादी विरामचिन्हांचा वापर कसा करतात ते उदाहरणासह स्पष्ट करावे.
उदा. १. दिपालीने पिशवीत हिरवी मिरची, काकडी, मेथी आणि कारली आणली. २. महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत ? अशा प्रकारची आणखी काही वाक्ये विद्यार्थाना श्रुतलेखनासाठी द्यावी. विद्याथ्र्यांनी लिहिलेले वाक्य तपासावे विद्यार्थ्यांच्या झालेल्या चुका दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहिण्यास सांगावे.
+ सराव करू या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गट करून गटप्रमुखाला पुस्तकातील एक छोटासा उतारा श्रुतलेखनासाठी सांगण्यास सांगावे. लिहून झाल्यानंतर मुलांना पुस्तक काढून स्वतःचा उतारा स्वतः तपासण्यास सांगावे. चुकीची दुरुस्ती करण्यास सांगावे.
+ कल्पकहोऊया
शिक्षकांनी पुढील कृती विद्यार्थाना करण्यास सांगावे. शाळेतील सूचनाफलक, गावातील दुकानांवरील पाट्या यांचे वाचन करा. ते वहीत लिहून काढा.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 15 :
समजून घेऊया : महाराष्ट्र प्राकृतिक रचना, पिके व भाषा यातील विविधता संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 15, माझा जिल्हा माझे राज्य
अध्ययन निष्पत्ती :
1) आपला जिल्हा व राज्य यांची प्राकृतिक व मानवनिर्मित घटक या अनुषंगाने तुलना करतात. 2) नकाशात जिल्हे व राज्यानुसार प्रमुख खाद्यान्न पिके व प्रसिद्ध खाद्यपदार्थ दाखवतात. लक्षात घेऊया :
महाराष्ट्र हे आपले राज्य आहे. या महाराष्ट्राचे प्राकृतिक रचनेनुसार तीन प्रमुख विभाग पडतात. किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर नागपूर ही उपराजधानी आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे, तर राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांग असून त्यात अस्तंभा हे सर्वात उंच शिखर आहे. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. यात कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. (ही प्राकृतिक रचना तुम्ही प. अ. अभ्यास-1 मधील पृष्ठ क्रमांक- 94 वरील महाराष्ट्र राज्य प्राकृतिक नकाशा आहे ती अभ्यासून पहा.)
महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये जशी विविधता आहे, तशी विविधता पिकांमध्ये व भाषेमध्ये सुद्धा दिसते. महाराष्ट्र राज्य जास्त, मध्यम व कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यानुसार येथे विविध पिके पिकतात. शेतातील पिकांचे उत्पादन हे हवामान, मृदा व पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते, कमी-जास्त पावसामुळे येथे पिकांच्या बाबतीत विविधता आढळते. शेती हा महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय आहे. येथे पावसाच्या प्रदेशानुसार पुढील पिके घेतली जातात. (यासाठी पृष्ठ क्रमांक-95 महाराष्ट्र राज्य वार्षिक पर्जन्यमान हा नकाशा अभ्यासा.) पावसाचे प्रदेश व मुख्य पिके :
सराव करू या :
प्र. 1) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) किनारपट्टीच्या प्रदेशात कोणते जिल्हे येतात, ते नकाशा पाहून लिहा.
ब) तुमच्या परिसरातील बोलीभाषेतील काही शब्द / वाक्य लिहा.
प्र. 2) खालील विधाने दुरुस्त करून लिहा .
अ) नागपूर ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
ब) राज्याच्या उत्तरेस अरबी समुद्र आहे.
प्र. 3 ) दिलेल्या जिल्ह्यासमोर तेथील मराठी बोलीभाषा लिहा.
अ) सिंदुधुर्ग
ब) नागपूर
क) पुणे
विषय – परिसर अभ्यास
पहिले काही आठवूया :
१) पुरंदर किल्याला कोणी वेढा दिला होता?
२) पुरंदरचा तह कोणात झाला?
३) पुरंदरच्या तहात काय ठरले होते?
• पेटाऱ्यातून पसार झाले:-हा पाठयांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग -२) या पाठ्यपुस्तकात पान क्र. ५१ व ५२
वर आहे.
अधिकची माहिती येथून मिळेल https://tinyurl.com/y6lwfy58
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१) शिवाजी महाराजांनी आग्र्याहून येताना संभाजीराजांना कोठे सुरक्षित ठेवले ?
२) आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय काय केले?
३) शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली ?