♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस पंधरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस पंधरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

• शाळेतले विविध सूचना फलक मुलांना दाखवावे. त्यावर थोडी चर्चा करावी त्या फलकावरील सुचनांचे वाचन करून घ्यावे. हे वाचन करून घेताना मुलांचा प्रतिसाद लक्षात

घ्यावा.

4 सक्षम होऊया

१. शिक्षकांनी विविध सूचना फलकांचे नमुने मुलांना दाखवून त्या फलकांविषयी मुलांबरोबर चर्चा करावी,

२. वेगवेगळ्या ठिकाणच्या फलकावरील सुचनातील वेगळेपण मुलांना समजून घेण्यास मदत करावी.

३. त्याचे महत्व मुलांना समजावून सांगावे.

४. आपल्याला आजूबाजूला असे सूचना फलक कुठे कुठे दिसतात त्याविषयी मुलाबरोबर चर्चा करावी

५. मुलांना आपापले प्रतिसाद देण्यास प्रोत्साहन द्यावे.

शिक्षकांनी मुलांकडून फलकाचे वाचन करून घ्यावे प्रश्न विचारून मुलांना आकलन झाले कि नाही हे तपासावे. उदा. हा फलक कोठे असेल? सूचना कोणी लिहिल्या असतील? का लिहित्या असतील?

शिक्षकांनी विविध फलकांचे नमुने निवडावेत व सराव द्यावा.

+ कल्पक होऊया

शिक्षकांनी आवश्यक ते मार्गदर्शन करून मुलांकडून करू मुलानो, आपल्या शाळेत [कविता] गायन स्पर्धा मुलासाठी पालकांसाठी सूचना

फलक तयार करा

 विषय –  गणित 

उदा. ३) एका टोपलीत २२ आंबे आहेत. ते चार जणांत समान वाटायचे आहेत. प्रत्येकी ५ याप्रमाणे २० आंबे वाटल्यास २ आंबे उरतील, म्हणजे पूर्ण आंब्यांची समान वाटणी करता येत नाही. २ आंबे उरतात. टोपलीत २०च आंबे असते तर समान वाटणी करताना आंबे बाकी उरले नसते. समान वाटणी करताना कधी कधी वस्तू

शिल्लक राहतात. या शिल्लक राहिलेल्या वस्तूंची संख्या म्हणजे बाकी.

 विषय –  इंग्रजी 

Day:- 15

Action song

2. Learning Outcome(s)/Competency Statement(s):

Listen attentively for various purposes

Recites the favourite poems and songs individually, in groups and in pairs with action.

3. Learning Activity/Experience:

Listen, Repeat, and read.

a b c d e f g

Come on Sonu, read with me.

h  i j k   l  m n

Count the books. We have ten.

o p q r s t u 

I am reading, so are you.

v and w x y z

Give me the books you have read.

विषय -परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 15

समजून घेऊ या : प्राण्यांचे व वनस्पतींचे अन्न

संदर्भ : इ.3री, पाठ 12 आपली अन्नाची गरज

अध्ययन निष्पत्ती : विविध वयोगटातील लोकांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील, घरातील पाण्याच्या उपयोगाच्या वर्णन करू शकतो.

लक्षात घेऊ या :

प्राण्यांचे अन्न : प्राणी विसर्गात तयार होणारे आयते अन्न शोधून खातात. काही प्राणी मांस खातात, तर काही प्राणी गवत आणि पाला खातात. काही प्राणी इतरांचे रक्त शोषतात, तर काही प्राणी किडे खातात. काही कीटक वनस्पतींची

पाने कुरतडून खातात.

कृती : खालील तक्त्ता पूर्ण कर. कोण काय खाते ते लिही.

सराव करू या

1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिही.

अ. कुत्र्यांना ——– जास्त आवडते.

ब. वनस्पतींचे अत्र ——– मध्ये तयार होते.

2. आंबोण कसे तयार करतात?

3. हिंस्त्र प्राणी मानवाच्या वस्तीत आढळले असे बऱ्याच वेळा बातम्यांतून आपण वाचतो/ ऐकतो. हे प्राणी वस्तीत येण्याचे काय कारण असेल ?

4. गाई, म्हशी यांना कोणते अत्र देतात?

 विषय –  परिसर अभ्यास  

करून पाहूयात.

१. https://bit.ly/3uUbCXI

१. घरातील व्यक्तींचा वयानुसार क्रम लावा. २. तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत तुमचे नाते व त्यांचे

नाव सांगा.

आवश्यक साहित्य

कुटुंबवृक्षाचा चार्ट

अध्ययन अनुभव

आपण आपल्या कुटुंबात जन्मतो वाढतो आई वडील आपल्या लहानाचे मोठे करतात आणि आपली काळजी घेतात.

१. आपल्या कुटुंबाचा कुटुंब वृक्ष तयार करा.

२. छोटे कुटुंब म्हणजे काय ते सांगा.

३. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कसा एकमेकांशी कसा वागतो ते निरीक्षण करा.

४. छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब यांचा शोध लावा.

काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले वा काय शिकण्यास मिळाले ?

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

१. छोटे कुटुंब म्हणजे काय ?

२. विस्तारित कुटुंब म्हणजे काय?

३. मोठे कुटुंब म्हणजे काय ?

४. शास्त्रीय पद्धत म्हणजे काय?