♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस पंधरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस पंधरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या : ● शिक्षक मुलांना परिचित साधे दोन तीन अक्षरी शब्द अचूक उच्चारासह

सांगतील.

मुले ऐकून शब्द लिहितील. मुलांचे शब्द तपासावेत. चुकलेले शब्द मुलांना लिहिण्यास सांगावे.

● शिक्षक, पालक मुलांना परिचित शब्द पाहून लिहिण्यास सांगतील. मुले पाहून शब्द लिहितील.

> सक्षम होऊ या:

● शिक्षक मुलांना परिचित साधे शब्द, जोडाक्षरयुक्त शब्द अचूक उच्चारासह सांगतील. मुले ऐकून शब्द लिहितील. मुलांचे शब्द तपासावेत. चुकलेले शब्द मुलांना लिहिण्यास सांगावे.

•● शिक्षक मुलांना मुलांच्या लेखनाचे नमुने दाखवतील.

१० परिचित शब्द देऊन लेखन करून घेतील.

सराव करू या :

इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्र. ९ वरील करंगळी, पुरणपोळी या सहा शब्दांचे लेखन करून घ्यावे.

करंगळी

पुरणपोळी

पाकळी

कळी

टाळी

मोळी

 विषय –  गणित 

जानेवारीच्या फरशीवर उभा राहा. दोन फरशा पुढे जा. कोणत्या महिन्याच्या फरशीवर आला आहेस? तो महिना किती दिवसांचा आहे ?

● जानेवारी पासून जून महिन्याची फरशी कितवी आहे ?

• जून मध्ये एकूण किती दिवस आहेत ?

 विषय –  इंग्रजी 

4. Solved Activity/ Demo:

Students repacat the sentences and learns the new words.

Teacher says and students repeats.

I want to play. Yes, you may,

I want to go out, yes you may.

I want to play. Yes, you may.

I want to read. Yes, you may.

I want to cat a mango. Yes, you may

I want to sleep. Yes, you may.

विषय -परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : १५ निवारा

समजून घेऊ या घर, घराची गरज, प्राणी व त्यांची घरे.

संदर्भ : इयत्ता दुसरीच्या ‘भाषा’ विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पृ.क्र. ३९ (परिसर समजून घेऊया) अध्ययन निष्पत्ती : अन्न, वस्त्र, निवारा यांच्याशी संबंधित उपक्रमात सहभागी होतो. लक्षात घेऊ या :

सराव करू या

प्रश्न १) उत्तरे लिहा.

१) पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात?

२) बिळात कोणकोणते प्राणी राहतात?

३) मुंग्या कशापासून वारूळ बनवत असतील?

प्रश्न २) खालील प्राणी व त्यांची घरे यांच्या जोड्या लावा.