♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस पंधरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस पंधरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

१) शिक्षकांनी वर्गातील विविध गोष्टींकडे निर्देश करावेत व ‘हे काय आहे?’ असे प्रश्न विचारावेत.

२) विद्यार्थी निर्देशित गोष्ट ओळखून नाव सांगतील. उदा. फळा, खडू, दरवाजा, पंखा इ.

३) वर्गातील शक्य त्या वस्तूवर त्या वस्तूच्या नावाची एक पट्टी चिकटवलेली असेल. ४) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्हरांडा, मैदान, शालेय परिसर फिरून दाखवावा.

(५) “हे काय आहे?” “या खोलीला काय म्हणतात?” असे प्रश्न विचारतील. उदा. कार्यालय (ऑफिस), भाताची खोली (पोषण आहार शिजवण्याची खोली), इ.

(६) शाळेचे नाव वाचायला सांगावे. (इथं अंदाजाने वाचन अपेक्षित आहे.)

4 सक्षम होऊ या

1) वर्गातील विद्यार्थ्यांचे गट करावेत.

2) वर्गात वाचन केलेल्या नामपट्ट्या मुलांना दाखवाव्यात.

3) त्यावर काय लिहिलेय हे अंदाजाने वाचायला सांगावेत.

4) मदत म्हणून त्या त्या वस्तूकडे निर्देश करावेत.

5) गटात एकेक नामपट्टी देऊन तिचे निरीक्षण करायला सांगावे.

+ सराव करू या

1) शिक्षकांनी कोणत्याही नामपट्टीवरील नाव वाचावे.

2) ती नामपट्टी ज्यांच्याकडे आहे तो गट तो विद्यार्थी ती पट्टी दाखवतील. तसेच वाचन करण्याचा प्रयत्न करतील. शक्य तिथे शिक्षकांनी मदत करावी.

3) अचूक नामपट्टी ओळखणाच्या गटाचे कौतुक करतील.

कल्पक होऊ या

1) वरील कृती विद्यार्थी गटांत एकमेकांत करून पहावी.

2) शिक्षकांनी केवळ निरीक्षण करावे.

3) शिक्षकांनी वातावरण आनंददायी राहील यासाठी प्रयत्न करावेत.

4) विद्यार्थ्यांना चूक असे न म्हणता शक्य तिथे मदत करावी.

5) शिक्षकांनी सर्व नामपट्ट्या भिंतीवर विद्यार्थ्यांना दिसतील अशा टांगून ठेवाव्यात.

नामपट्ट्या फळा, टेबल, नळ, खिडकी, दरवाजा, पंखा (फॅन), पुस्तक, वही, कपाट, पताका, टी.व्ही., मोबाईल, कचरा पेटी, बटण, खुर्ची इ.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

My Name is ———–

I am———– years old.

I live in———–

I go to  ————School.

Tyne here to such———–

My favourite sport is———–

My father is a————-

———–is my favourite food.

Extension Activity / Parallel Activity / Reinforcement:

Let me tell about me.

Hi, my name is————

I am———– years old.

My birthday is on———–