♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस चौदावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस चौदावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊया!

शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून काही वाक्ये वाचून घ्यावीत; त्यातील उद्देश्य व विधेय ओळखायला सांगावेत. १. आईने मोठमोठ्या भाकरी केल्या. २. ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आळंदीला आहे.

३. माझे निळे पेन ताईने घेतले. ४. लेखक डोंगरावरील जमिनीचे निरीक्षण करू

. उंदराने डोक्यात टोपी घालून नाच केला. ५.

शिक्षकांनी फळ्यावर आणखी काही वाक्ये लिहावीत आणि वाक्यातील प्रकार ओळखायला सांगावेत.

१. व्यायामाने आरोग्य चांगले राहते.

३. अरेरे! खूपच लागलं आहे.

२. काय गं, कसा आणलास गहू?

४. व्यायाम करा. आरोग्य सांभाळा.

५. तू व्यायाम करतो की नाही?

सक्षम बनूया !

याशिवाय वाक्याचे आणखी काही प्रकार असतात हे शिक्षकांनी विदयार्थ्यांना खालीलप्रमाणे समजावून

सांगावे.

केवलवाक्य केवल वाक्यात एकच विधान असते. त्यामुळे यामध्ये एकच उद्देश्य आणि एकच विधेय असते. – केवलवाक्य हे आज्ञार्थी, विधानार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यांपैकी कोणत्याही प्रकारातील असू शकते. उदा.

मी रोज सूर्यनमस्कार करते.

तुला बागकाम आवडते का?

मकरंद, तू लिहिलेला निबंध वाच.

मिश्र वाक्य – मिश्र वाक्यांत दोन किंवा अधिक वाक्ये असतात, जी एकमेकांवर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य ‘मुख्य वाक्य’ असते, तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य गौण वाक्य असते. उदा.

जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बागेत जाईल.

आकाशात ढग जमले की मोर नाचू लागतात.

नियमित अभ्यास केला तर परीक्षेच्यावेळी गडबड होत नाही.

कधी कधी एका मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्ये अवलंबून असतात. ही गौण वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांना जोडलेली असतात.

संयुक्त वाक्य संयुक्त वाक्यांत दोन वाक्ये असतात. ती दोन वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, पण ती स्वतंत्र असतात. म्हणजे ती दोन केवलवाक्ये असतात. अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकांवर अवलंबून नसतात. यालाच जोडवाक्य असेही म्हणतात.

> रईसा रोज सकाळी घरकामात मदत करते आणि सायंकाळी अभ्यास करते.

तिने घडलेल्या सर्व घटना सांगितल्या; परंतु तरीही त्यांचे समाधान झाले नाही.

4 सराव करू या!

वाक्यांचे प्रकार ओळखा.

१. पाऊस आला की शेतकरी पेरणीला लागतो.

२. मंदा खो खो खेळेल किंवा समूहगीतामध्ये भाग घेईल.

३. माझे बोलून झाले की मग तू बोल.

४. जेवढी भूक लागते तेवढेच खाणे म्हणजे प्रकृती.

५. आपल्या जेवणातील दोन घास भुकेलेल्यांना खाऊ घालावेत.

+ कल्पक होऊ या!

एका मोठ्या तक्त्यावर वाक्याचे प्रकार आणि संबंधित उदाहरणे लिहा.

‘मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांतील फरक’ यावर आपल्या मित्रांमध्ये चर्चा करा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Day:- 14

1. Title:- Let’s Read

2. Learning Outcome(s)/Competency Statement(s):

07.17.26 Reads simple passages on familiar topics and identifies details, characters, main idea and sequence of ideas and events (Comprehends)

3. Learning Activity/Experience:

Rearrange the events to frame a story.

1. The farmer quickly realized his foolish mistake and proceeded to cry over his lost resource.

2. But, as he opened the stomach, the only thing he found was guts and blood.

3. But, one day, the farmer thought to himself, “Why should we take just one egg a day? Why can’t we take them all at once and make a lot of money?” The farmer told his wife his idea, and she foolishly agreed.

4. Once upon a time, a farmer had a goose that laid one golden egg every day. The egg provided enough money for the farmer and his wife to support their daily needs. The farmer and his wife continued to be happy for a long time.

5. As the days went on, the farmer and his wife became poorer and poorer. How jinxed and how foolish they were.

Then, the next day, the goose laid its golden egg, the farmer was quick with a sharp knife. He killed the goose and cut its stomach open, in the hopes of finding all its golden eggs.

4. Solved Activity/ Demo:

The Golden Egg

Once upon a time, a farmer had a goose that laid one golden egg every day. The egg provided enough money for the farmer and his wife to support their daily needs. The farmer and his wife continued to be happy for a long time.

But, one day, the farmer thought to himself, “Why should we take just one egg a day? Why can’t we take them all at once and make a lot of money?” The farmer told his wife his idea, and she foolishly agreed.

Then, the next day, as the goose laid its golden egg, the farmer was quick with a sharp knife. He killed the goose and cut its stomach open, in the hopes of finding all its golden eggs. But, as he opened the stomach, the only thing he found was guts and blood.

The farmer quickly realized his foolish mistake and proceeded to cry over his lost resource. As the days went on, the farmer and his wife became poorer and poorer. How jinxed and how foolish they were.

5. Practice:

Once students rearrange the story, ask them to follow the instructions.

1. Enlist the characters in the story.

2. Suggest the title to the story.

3. What is the moral of the story

If you were in place of the farmer what would you do?

6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

Read other stories from story book and try to write the gist of it. 

https://www.freechildrenstories.com/

विषय -विज्ञान 

कृतिपत्रिका : 14

समजून घेऊ या : उपयोगी सूक्ष्मजीव, उपद्रवी सूक्ष्मजीव, रोगकारक सूक्ष्मजीव. संदर्भ: इयत्ता सातवी प्रकरण क्रमांक 1 पेशीरचना आणि सूक्ष्मजीव

अध्ययन निष्पत्तीः पेशींची रचना अचूकपणे काढून त्याविषयी स्पष्टीकरण देता येणे. दैनंदिन जीवनातील विविध क्रियांमध्ये असणारी सूक्ष्मजीवांची भूमिका सकारण स्पष्ट करता येणे. सजीवांच्या विविधतेमधील एकता शोधून त्यांचे केले गेलेले वर्गीकरण नेमकेपणाने स्पष्ट करता

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

पहिले काही बाबी आठवूया!

1) संविधनाची उद्देशिका म्हणजे काय?

2 ) उद्देशिकेची सुरुवात कोणत्या शब्दांनी होते?.

3) भारतातील विविध धर्माची नवे सांगा.

करून पाहूयात

1) उद्देशिकेतील न्यायाचे तीन प्रकार शोधा.

वरील चित्राचे निरीक्षण करून दोन शब्दातील फरक सांगा.

इयत्ता : ७वी चे इतिहास व नागरिकशास्त्र विषयाचे पाठ्यपुस्तक. मित्रांशी फोनवर चर्चा करा.

कृती

१) घरातील आई-बाबा कशा पद्धतीने कामे करतात. त्यात तुमचा सहभाग कसा असतो. एकमेकांचे विचार, मते विचारात घेतली जातात का? भांडण केल्यानंतर लगेच मिटवता का? आजी-आजोबांना विचारले जाते का? अनुजाला शेतीच्या अभ्यासात संशोधन करावयाचे आहे.

तिचा निर्णय सर्वांना आवडतो का?

कुटुंबातील वरील गोष्टींचे निरीक्षण करून शिक्षकाच्या मदतीने शब्दांचे अर्थ व महत्त्व लक्षात घ्या.

२) शाळा सुरु झाल्यावर वर्गातील वर्ग प्रतिनिधीची लोकशाही पद्धतीने निवड कशी करता येईल ते लिहा.

काय समजले?

ही कृती करून तुला काय समजले किवा शिकण्यास मिळाले?

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

तणाव क

प्रश्न १ : प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय?

प्रश्न २ : आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात?

प्रश्न ३ : भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे?

अधिक सराव करू –

१) ७वी चे नागरिकशास्त्र विषयाचे पाठ्यपुस्तकातील यामध्ये दिलेला कृती व स्वाध्याय सोडवा.

२) शिक्षकांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया समजून घ्या.

 विषय –  भूगोल 

पहा बरे जमते का

शिक्षकसित प्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनीद्वारे चर्चा

1 सांकेतिक खुणा व चिन्हे यातील फरक लिहा.

2 समोच्य रेषा पद्धती म्हणजे काय?

3 रंग पद्धती चा उपयोग कशासाठी होतो?

4 उठाव दर्शक आराखडा माहिती लिहा.

5 समोच्चता दर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो?