♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस अठरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस अठरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या.

आकाशात काळे काळे ढग दाटून आले होते. सगळीकडे अंधार झाला होता. •आत्ता तर चारच वाजले होते, तरीही रात्र झाल्यासारखे वाटत होते. अचानक ढगांचा गडगडाट ऐकू आला. वीजा चमकू लागल्या. वारे सुटले. आणि पाचच मिनिटांत धो धो पाऊस कोसळू लागला. ताई आणि मी खिडकीत उभं राहून पाऊस बघत होतो. तेवढ्यात आईने सर्वांसाठी गरमागरम चहा आणि खारी आणली. पाऊस बघतच खारी खाताना खूप मजा आली.

० शिक्षकांनी याप्रकारचे प्रकट वाचनासाठी उतारे उपलब्ध करून द्यावेत. तसेच ● शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही विनोद / विनोदी प्रसंग सांगावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विनोद सांगायला लावावेत. पुढील विनोदाचे वाचन गटात करा..

सक्षम बनू या

आज चंदूला खूप भूक लागली होती, कारण आज दररोजच्यापेक्षा जरा जास्तच वेळ खेळला होता. आई भरभर चपात्या लाटत होती. चंदू आईसमोर नाचत नाचत मैदानावर केलेल्या गमती जमती सांगत होता. आई स्वयंपाक करता करता कौतुकाने चंदूचे बोलणे ऐकून गालात हसत होती

वरीलप्रमाणे छोट्याछोट्या उता-यांचे प्रकटवाचन घ्यावे. प्रश्न विचारून आकलन तपासावे, जसेकी

१) चंदूला भूक का लागली होती ?

२) आई काय करत होती ?

३) चंदू आईला काय सांगत होता ?

> सराव करू या.

० विविध प्रकारचे वाचन करून घ्यावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्तमान पत्रातील/ उपलब्ध बालसाहित्यातील विनोद वाचायला द्यावे.

● वाचलेला विनोद सर्वांना सांग, याप्रमाणे सराव करून घ्यावा.

> कल्पक होऊ या

> तुम्हाला आवडलेली गोष्ट, उतारा आईला मोठ्याने वाचून दाखवा. > आवडलेल्या पुस्तकातले नवे शब्द पेन्सीलने गोल करून मोठ्याने वाचा.

> याविनोदी प्रसंगाचे वाचन कर, अशा वेगवेगळ्या विनोदांची कात्रणे जमव व वाच.

 विषय –  गणित 

१. हिरव्या रंगाचा ड्रेस घातलेल्या मुलीचा रांगेतील क्रमांक कितवा?.

२. रांगेत एकूण किती मुले व मुली आहेत ?

३. रांगेतील दोन्ही मुलांचा क्रमांक कितवा आहे?

४. सोनेरी केसांच्या मुलीचे रांगेतील स्थान कितवे आहे?

५. पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी रांगेत कितव्या स्थानी आहे?..

सोडवून पाहू 

१,२,३,४ या मूल्यवाचक संख्यांचा व पहिला, दुसरा, तिसरा….. ह्या क्रमवाचक शब्दांचा कोठे कोठे उपयोग केला

जातो याची यादी तयार कर.

“”

 विषय –  इंग्रजी 

विषय -परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : २८

बाढ

समजून घेऊ या वाढ, वनस्पतींमधील वाढ, बाळाची वाढ, प्राण्यांमधील वाढ. संदर्भ : इयत्ता पहिलीच्या ‘खेळू, करु, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ.क्र. ५१९ अध्ययन निष्पत्ती अन्न, वस्त्र, निवारा यांच्याशी संबंधित उपक्रमात सहभागी होतो. लक्षात घेऊ या

सराव करू या :

शरीराच्या वाढीसाठी अत्राची गरज असते.

प्रश्न १) उत्तर लिहा.

१) कुंडीतील रोप सुकले आहे. तुम्ही काय कराल?

२) तान्ह्या बाळाची वाढ होण्यासाठी तुम्ही त्याला काय खायला द्याल?

३) चित्रातील बाळाला तुम्ही खालील शर्ट घालणार का? कारण सांगा.

प्रश्न २) आंब्याच्या बीचे चित्र काढा व रंग भरा.

प्रश्न ३) बाळाच्या वाढीनुसार योग्य क्रमांक द्या.