♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस अठरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस अठरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

+ सक्षम बनू या :

मुलांना चित्र निरीक्षण करताना कोणकोणत्या बाबी दिसतात याविषयी बोलू द्यावे. त्यांच्या भाषेचा, बोली भाषेचा स्वीकार करावा. विचार करण्यास प्रवृत्त करावे.

दोन चित्रातील फरक ओळखण्यासाठी या प्रमाणे इतर चित्र शोध व फरक सांग. याप्रमाणे कृती घ्यावी. तसेच शिक्षकांनी स्वतः एका चित्रातील फरक शोधून चित्राविषयी बोलावे.

+ चला सराव करूया :

भाषा साहित्य पेटीतील चित्रे देऊन गटाने चित्रातील फरक ओळख घ्यावी.

• कल्पक होऊया :

वर्तमानपत्र, इतर पुस्तके, गोष्टी पाहून त्यांतील चित्रांविषयी माहिती सांगा.

 विषय –  गणित 

थोडी उजळणी / सराव : वस्तूच्या सहाय्याने वजाबाकी. (प्रत्यक्ष कृती करून घ्यावी.) (१) ३ बिस्किटे घे त्यातील १ खाऊन टाक आता तुझ्याकडे किती बिस्किटे उरली ?

२) ५ गुळगुळीत दगड गोळा कर

३) ६ कागद घे त्यातील ३ कागदाच्या होड्या बनव आता तुझ्याकडे किती कागदाच्या होड्या बनवायच्या राहिल्या ?

त्यातील २ दगड आपल्या मित्राला दे आता तुझ्याकडे किती दगड उरले ?

थोडे आठवूया : वजाबाकी म्हणजे काढले, उडाले खाली पडले दिले, हरवले, खर्च झाले, संपले . कमी केले फेकून दिले, गळाले, खराब झाले

 विषय –  इंग्रजी