पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस सतरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस सतरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊया.

दिलेल्या उताऱ्याचे प्रकटवाचन व मूकवाचन विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी करून घ्यावे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना परमवीर चक्र या विषयाची माहिती देऊन योग्य मार्गदर्शन करावे व त्यांच्या संकल्पना जाणून घ्याव्या.

पावसाळ्याचे दिवस होते.. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या कुंदा वयाच्या आठव्या वर्षी पोहायला शिकली होती नदीकाठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या . खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या, ते कळलेच नाही तिकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या .एवढ्यात नीला चा मोठ्याने रडण्याचा ओरडण्याचा आवाज आला धावा! धावा !लवकर या रजिया पाण्यात पडली ‘कोणीतरी वाचवा हो !’ ही हाक कुंदाच्या कानावर पडल्या बरोबर ती धावतच नदीकिनारी पोहोचली. रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती.

कुंदा ने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत नदीच्या दिशेने निघाली तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. कुंडाने रझियाला काठाकडे आणले. लोकांनी मोठा दोर पुण्यात सोडला होता. कुंदा ने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले ही बातमी गावभर पसरली. साऱ्या गावात कुंदाच्या साहसाचीच चर्चा होती साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली.

. वरील उताऱ्यातील घटनाक्रमाने सांगण्याची सूचना द्यावी. घटनाक्रम सांगताना योग्य ते मार्गदर्शन करावे. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मते जाणून घ्यावी.

कुंदा केव्हा पोहायला शिकली होती ?

कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?

उतारा वाचून तुम्हाला कुंदाचे कोणते गुण जाणवले ते लिहा.

+ सक्षम बनू या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरील घटना वाचल्यानंतर आपले विचार लिखित स्वरूपात मांडण्याकरता प्रोत्साहित करावे व प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्याकरिता योग्य मार्गदर्शन करावे

कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकोनात लिहा

तुम्ही स्वतः पाहिलेली व ऐकलेली अशा प्रकारची साहसी कथा किंवा घटना याचे विद्यार्थ्यांना

वर्गात कथन करावयास सांगावे.

+ सराव करूया

कृती- १ तुम्ही रजियाचे हितचिंतक आहात. या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल.

कृती- २ – खालील उताऱ्याचे प्रकट व मुक वाचन करा.

परमवीर चक्र’ पदक दिसायला अगदी साधे आहे. कांस्य धातूपासून बनवलेले, छोठ्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे. गडद जांभळी कापडी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्य, पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत. त्यांच्या मधे दोन कमलपुष्पे आहेत. ‘परमवीर चक पदकाचे डिझाइन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. त्या मूळच्या युरोपियन, परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून तप भारतात आल्या. या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम. त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच, शिवाय भारतातील कला, परंपरांचाही खूप अभ्यास केला. मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या अस्खलितपणे बोलत असत.

+ कल्पक होऊ या.

1. परमवीर चक्राचे चित्र काढा व रंगवा

2. आंतरजालावरून आपल्या परमवीर यांचे चित्र मिळवा चित्र, नाव व पाच-सहा वाक्यात त्यांची माहिती या पद्धतीने चिकटवहीत चिटकवा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

3. Learning Activity/Experience:

1) Teacher divides the class in groups (minimum 3-4 students in a group) and asks them to read the unseen passage. Provide 1 passage for each group

Many people who are looking to get a pet dog get a puppy. There are many reasons why people get puppies. After all, puppies are cute, friendly, and playful. But even though puppies make good pets, there are good reasons why you should consider getting an adult dog instead. When you get a puppy, you have to teach it how to behave. You have to make sure that the puppy is housebroken so that it does not go to the bathroom inside the house. You have to teach the puppy not to jump up on your guests or chew on your shoes. You have to train the puppy to walk on a leash. This is a lot of works. On the other hand, when you get an adult dog, there is a good chance

That it will already know how to do all of the previously mentioned things. Many adult dogs have already been housebroken. Many adult dogs will not jump on or chew things that you do not want them to jump on or chew. Many adult dogs will be able to walk on a leash without pulling you to the other side of the street. Puppies also have a lot of energy and want to play all of the time. This can be fun, but you might not want to play as much as your puppy does. Puppies will not always sleep through the night or let you relax as you watch television. On the other hand, most adult dogs will wait on you to play. What is more, they will sleep when you are sleeping and are happy to watch television on the couch right beside you. There is one last reason why you should get an adult dog instead of a puppy. When most people go to the pound to get a dog, they get a puppy. This means that many adult dogs spend a lot of time in the pound, and some never find good homes. So if you are looking to get a dog for a pet, you should think about getting an adult dog. They are good pets who need good homes

Questions

1. Make a list of all the new/unfamiliar words from the passage and make a note of it/underline it.

2. In groups read the context of the underlined word and try to guess the meaning of the word.

3. Now search the word in the dictionary and make a note of the meaning in your book. 4. After knowing the meaning of the word try to use it in your words and make meaningful sentences

5. Follow the same procedure for the remaining words.

विषय -विज्ञान 

कृतिपत्रिका : 17

द्रव्य, मूलद्रव्य, मूलद्रव्यांच्या संज्ञा

इयत्ता सातवी प्रकरण 14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे

समजून घेऊ या :

संदर्भ:

अध्ययन निष्पत्ती आपल्या दैनंदिन वापरांचे स्वरूप, गुणधर्म, अवस्था व त्यांचे होणारे परिणाम यांबाबतची माहिती

स्पष्ट करता येणे.

सराव करू या :

1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

i) दिलेल्या गटातील वेगळा घटक शब्द ओळखा. कार्बन, सल्फर, सिलिकॉन, क्लोरीन

उत्तर – …………………………………

ii) पाणी, सरबत, लोखंड, पोलाद, कोळसा, हवा, मीठ, तांबे, पितळ, माती यांमधील मिश्रणे कोणती?

उत्तर – …………………………………

2. ‘C’ या इंग्रजी मुळाक्षरांपासून सुरु होणाऱ्या मूलद्रव्यांची नावे लिहून त्यांच्या संज्ञा लिहा.

उत्तर – …………………………………

3. हवेमध्ये असणारी मूलद्रव्ये कोणती ? त्यांच्या संज्ञा लिहा.

उत्तर – …………………………………

4. शिसे आणि कथिल या मूलद्रव्यांची संज्ञा त्यांच्या लॅटिन नावावरून घेतल्या आहेत, त्या मूलद्रव्यांची लॅटिन व इंग्रजीतील नावे शोधा आणि त्यांच्या संज्ञा लिहा.

उत्तर – …………………………………

5. पुढील सारणी पूर्ण करा.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झालाआहे

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झालाआहे