पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस सतरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस सतरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

थोडं समजून घेऊ

विभाजक विभाज्य

45 ला 5 ने भागल्यावर बाकी शून्य येते म्हणून 5 हा 45 चा विभाजक आहे व 45 ही संख्या 5 ने विभाज्य आहे.

45 चे विभाजक : 1, 3, 5, 9, 15, 45

36 चे विभाजक : 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18, 36

Draw

Highlight

दिवस – सतरावा

दिलेल्या संख्यांचा मसावि काढणे म्हणजे संख्यांच्या विभाजकांची यादी करून त्यांतील सर्वांत मोठा सामाईक विभाजक शोधणे. थोडक्यात मसावि म्हणजे दिलेल्या संख्यांना नि:शेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या होय. 12 व 18 या संख्यांचा मसावि शोध.

12 चे विभाजक : 1, 2, 3, 4, 6, 12

18 चे विभाजक : 1, 2, 3, 6, 9, 18

12 व 18 चे सामाईक विभाजक : 1, 2, 6.

12 व 18 यांच्या सामाईक विभाजकांपैकी 6 हा सर्वांत मोठा विभाजक आहे, म्हणून 12 व 18 या संख्यांचा मसावि 6 येईल.

प्रश्न 1) दुकानात 20 किग्रॅ ज्वारी व 50 किग्रॅ गहू आहेत. सर्व धान्य पिशव्यांमध्ये भरायचे आहे. प्रत्येक पिशवीत समान वजनाचे धान्य भरायचे आहे, तर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल ?

प्रश्न 2) 18 मीटर लांब व 15 मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकारांचे चौरसाकृती सारखे वाफे तयार करायचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा ?

प्रश्न 3) 8 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडांचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत, तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी ?

प्रश्न 4 ) चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी 6 वी व 7 वी च्या वर्गातील अनुक्रमे 140 व 196 वि दयार्थी सहलीसाठी गेले. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे समान संख्येचे गट करायचे आहेत. प्रत्येक गटाला माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शक त्याची फी देऊन मिळतो. जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील ? प्रत्येक गटात जास्तीत जास्त विदयार्थी घ्यायचे कारण काय असेल ?

प्रश्न 5) तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 2610 किग्रॅ व इंद्रायणी जातीचे 1980 किग्रॅ तांदूळ बियाणे आहे. त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत, तर प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल ? प्रत्येक जातीच्या तांदळाच्या किती पिशव्या तयार होतील ?

 विषय –  इंग्रजी 

Activity No. 17

Day: – 17

1. Title: –

Story telling (The Nightingale and the Nobleman)

2. Learning Outcome(s)/Competency Statement(s): –

06.17.26-Presents the main points or outline of passage, story etc.

07.17.10 Participates in different activities in English such as role play, poetry recitation, skit, drama, speech, quiz etc, organized by school and other such organisations.

3. Learning Activity/Experience: –

At first teacher will ask the questions to the students.

Do you like stories?

Who tells us a story?

How many stories you have listened?

Students will tell the answers.

4. Solved Activity/ Demo: –

Teacher will tell the students two sentences about nightingale: –

Nightingale is a cute bird.

It has different colours.

⚫ Nightingale sings mainly during the night but can also be heard in the daytime. Student will tell two sentences about nightingale.

5. Practice: –

• Alon with your friend listen carefully to the stories related birds and animals on the YouTube channel.

Asks some questions based on the story to each other.

6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement: –

Read the story or listen the story (on YouTube) The Worth of a Fabric from your book and try to tell it to your friend or relatives in short.

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे .

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे .

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे .