पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस अठरा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
संबोध कोपरा
प्रमाणित एककामध्ये सर्वमान्य एकक आहेत- सेंटीमीटर, मीटर व किलोमीटर. काही वेळा तू इंच, फुट ही एकके सुद्धा ऐकतो.
१०० सेंटीमीटर = १ मीटर
• सराव कोपरा
तू घरी किंवा शाळेत किंवा परिसरात कोण कोणत्या वस्तूंची किंवा बाबींची लांबी मोजत असताना पाहिले आहे? किमान 5 उदाहरणे नोंदव, लांबी मोजण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा उपयोग तुझ्यासमोर करण्यात आला होता, त्यांची नावे लिही.
• लांबी मोजण्याच्या संदर्भाने तू आजपर्यंत वापरलेल्या आणि ऐकलेल्या सर्व शब्दांची यादी तयार कर.
कृती क्रमांक १) घरातील एक टॉवेल घे, तो जमिनीवर अंथरून त्याची लांबी तुझ्या वितीने मोज आणि नोंद कर. त्यानंतर त्याच टॉवेल ची लांबी आईला किंवा बाबांना त्यांच्या वितीने मोजण्याची विनंती कर व किती विती भरते याची नोंद कर. आलेल्या नोंदी चे निरीक्षण करून काय निष्कर्ष निघाला याची वहीमध्ये नोंद घे.
~ आपण जर कापड दुकानदाराकडून वितीने मोजून कापड विकत घेतले तर काय होईल ?
तुमच्याकडे असलेल्या /तुझ्याकडे असलेल्या पुस्तकाची वहीची लांबी आणि रुंदी मोजपट्टी च्या साहाय्याने मोज व लिही.
● घरातील चटई, बैठक रूम, टॉवेल, हात रुमाल इत्यादी लांबी रुंदी मोज व वहीमध्ये नोंद कर.
तू वही ची लांबी कशाने मोजणार ?
तुझी उंची किती आहे मोजून लिही.
घरापासून ते जवळच्या किराणा दुकानापर्यंतचे अंतर मोजण्यासाठी कोणते साधन वापरशील ?
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 18
• समजून घेऊ या. आहार विषयी घ्यावयाची काळजी
संदर्भ : इ. 3री, पाठा3. आपला आहार
अध्ययन निष्पत्ती विविध ययोगटातील लोकांच्या, प्राण्यांच्या पक्ष्यांच्या, अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील, घरातील पाण्याच्या उपयोगाच्या वर्णन करू शकतो.
लक्षात घेऊ या प्रकृती चांगली हवी असेल तर आहाराविषयी काळजी घ्यावी लागते. म्हणून घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत. व आवडणारे पदार्थही खाल्ले पाहिजेत. मोड आलेले कडधान्य, पालेभाज्या आपल्या आहारात वारंवार असाव्या, दही, ताक या पदार्थांचा अधूनमधून जेवणात समावेश असावा. बाहेरील उघड्यावरील व पाकिटातील चमचमीत पदार्थ आरोग्यास हानिकारक असतात, ते खाणे टाळावे.
सराव करूया :
1. खालील तक्त्यामध्ये तुम्ही दिवसभरात खात असणाऱ्या विविध बाबींची वारानुसार नोंद करा. आठवडा पूर्ण झाल्यावर प्रत्येक वारानुसार खाल्लेल्या पदार्थांचे निरीक्षण करा.
विषय – परिसर अभ्यास
करून पाहूयात –
१. खेळताना समूह करून खेळा.
२. चांगल्या सवयी अंगी बाणा.
३. तुमच्या कुटुंबातील चांगल्या स्वभावाची व्यक्ति शोधा
आवश्यक साहित्य – कुटुंब व समूहजीवनाचे चित्र
अध्ययन अनुभव –
आपण आपल्या मित्रांसोबत खेळत असतो . खेळताना विशिष्ट नियम पाळून खेळतो.
१. विशिष्ट अंतर ठेऊन खेळ खेळा.
३. खेळतांना नियम पाळा
२. खेळतांना भांडण करू नये.
४. सोबत राहूनच खेळा
काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते लिहा
या प्रश्नांची उत्तरे शोधू –
१. कोणकोणते मैदानी खेळ खेळतो ?
२. खेळतांना मित्रा मित्रांत भांडण होत काय ?
३. खेळामुळे कोणते गुण अंगी बाणतात ?