♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस दहावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस दहावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

> जाणून घेऊया

फळयावर ‘कपाट’ हा शब्द लिहावा. लिहिलेला शब्द वाचून दाखवावा. वाचून दाखवताना तो क-पाट असा तोडून वाचावा. मुलांना कपाट या शब्दातील सुरूवातीला कोणता आवाज ऐकू येतो? मध्ये कोणता आवाज ऐकू येतो? शेवटी कोणता आवाज ऐकू येतो? असे प्रश्न विचारून शब्दातील आवाज लक्षात आणून देतात. आणखी काही शब्दातील आवाज शोधण्याचा सराव घेतात.

→ सक्षम होऊया.

दिलेल्या शब्दाचा शेवटचा आवाज ( अक्षर ) ऐकून त्या अक्षरापासून सुरू होणारा शब्द सांगण्याचा खेळ घेतात उदा . पुस्तक – कपाट टोपी -परात -तलवार रूपया इत्यादी हे शब्द लिहिण्यास सांगतात.

> सराव करूया

याप्रमाणे दोन गट करून शब्द साखळीचा खेळ खेळतात.

जमिनीवरही शब्द जोडण्याचा हा खेळ घेता येईल. सांगितलेला शब्द अर्थपूर्ण आहे का? सर्व मुलांना शब्दाचा अर्थ माहीत आहे का याची खात्री करतील.

सुरूवातीचा शब्द देवून शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्द लिहिण्यास सांगतात.शब्दांची साखळी जास्तीत जास्त लांब होण्यासाठी प्रोत्साहन देतात. सांगितलेल्या शब्दांचा अर्थ लक्षात आणून देतील. त्या शब्दांचा वाक्यात वापर करायला सांगतील.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : १० आपत्ती व्यवस्थापन

नैसर्गिक सार्गिक घडामोडी. संदर्भ: आप व्यवस्थापक (इक्ता दुसरीच्या खेड, करू, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ.क्र. ३८)

सराव करू या !

प्रश्न १) उत्तरे लिहा.

१) तुमच्या गावात पाण्याची कमतरता आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल?

उत्तर – …………………………..

२) पुराच्या पाण्यात तुम्ही पोहणार का? कारण सांगा.

उत्तर – …………………………..

प्रश्न २) चूक की बरोबर ते लिहा.

१) पूर आल्यावर नदीचे पाणी कमी होते.

२) दुष्काळ पडल्यावर जमीन कोरडी होते.

३) जमीन हलते यास वणवा असे म्हणतात.

४) वीज कोसळल्यावर कोणतेही नुकसान होत नाही.

५) वादळात घरे, गाड्या, माणसे वाहून जातात.

प्रश्न ३) डोंगर, सूर्य, चंद्र, तारे, झाड, नदी यापैकी कोणतेही घटक निवडून चित्र काढा व रंगवा.

उत्तर – …………………………..