♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस दहावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस दहावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

1) या खेळासाठी मुलांना गोलात बसवा.

2) कोणत्याही एका वस्तूचे नाव एका मुलाला सांगायला सांगा.

उदा. कप कपमधे शेवटी कोणता आवाज ऐकू आला हे त्याच्या शेजारील मुलाला विचारा. -प

3) मग प ने सुरू होणारा शब्द सांग हे त्याच्या पुढील मुलाला विचारा. — पतंग 

4) पतंगमधे शेवटी कोणता आवाज ऐकू आला सांग हे त्याच्या पुढील मुलाला विचारा. ….ग.

 5 ) मग ग ने सुरू होणारा शब्द सांग हे त्यापुढील मुलाला विचारा. 

याप्रमाणे सर्व मुलांना सहभागी करून घ्या.

+ सक्षम बनू या

1) अक्षरात शेवटचा असणारा ध्वनी शब्द हा काही शब्दांत सुरूवातीला ही येतो हे ध्यानात आणूण देणे.

+ चला सराव करूया

1) परिसरातील प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या नावांच्या शब्दभेंड्या घ्या.

+ चला कल्पक बनूया

चला कल्पक बनुया

आता हाच खेळ खालीलप्रमाणे विविध अटी बालून खेळता येईल..

1) शब्दातील पहिले अक्षर असलेला शब्द सांगणे ही अट घालून खेळायला सांगा. ते अक्षर शब्दात कुठेही आले तरी चालेल हेही सांगा.

( उदा. कप हा शब्द सांगा. कपमधे पहिला कोणता आवाज ऐकू आला हे पहिल्या मुलाला विचारा, क. मग के आवाज असलेला शब्द कोणता पुढील मुलाला विचारा, मका, मकाम पहिला आवाज

कोणता ऐकू आला सांग हे त्यापुढील मुलाला विचारा – म, मग म ने सुरू होणारा शब्द सांग हे

त्यापुढील मुलाला विचारा.

याप्रमाणे सर्व मुलांना सहभागी करून घ्या.

2. शेवटी ‘कन’ असणारे शब्द घेऊन. उदा. चटकन पटकन कचकन

3. शेवटी ‘वार’ असलेले शब्द उदा. सोमवार, गवार

4. सुरवातीला ‘प्र’ असलेले शब्द याप्रमाणे गटात अशाप्रकारे शेवटी किंवा सुरवातीला वेगवेगळे प्रत्यय अथवा अक्षरे जोडले जाऊन बनणारे शब्द अशा असंख्य प्रकारे होऊ शकेल .

5. जेवढी टिंबे तेवढ्या अक्षरांचा शब्द उदा 1).. मला, 2) …अवनी 3)….. इमारत इत्यादी

6. कळ या शब्दात एक बदल करूनशब्द तयार करा. उदा. कळी, काळ, संकळ इ. (असे वड, वर, मन असे विविध पर्याय देता येतील )

7) आवाजदर्शक शब्द घेऊन उदा. सळसळ, फुरफुर, टपटप यासारखे आणखी खेळ तुम्हालाही सहज शोधून काढता येतील.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी