पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस दहावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस दहावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

सराव करू या..

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही वाक्ये देऊन त्यातील नाम, सर्वनाम ओळखण्याचा सराव

करून घ्यावा.

उदा. शीतल हुशार मुलगी आहे. तिला मराठी विषय खूप आवडतो.

शीतल – विशेष नाम, हुशार भाववाचक नाम, मुलगी सामान्य नाम, मराठी

विशेष नाम, विषय सामान्य नाम

विद्यार्थ्याना काही वाक्ये नामांचा वापर करून द्यावीत व ती सर्वनामे वापरून पुन्हा

वहीत लिहिण्यास सांगावे.

उदा. सागर शाळेत जातो. सागरला मराठी विषय आवडतो. सागरचे हस्ताक्षर वळणदार आहे.

उ: सागर शाळेत जातो. त्याला मराठी विषय आवडतो. त्याचे हस्ताक्षर वळणदार आहे.

+ कल्पक होऊ या..

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध विषयदेऊनकिमान १० ओळी लिहिण्यास प्रवृत्त करावे यामध्येनाम व सर्वनाम यांचा वापर करण्यात प्रेरित करावे. 

नाम आणि नामांचे प्रकार, सर्वनाम व सर्वनामांचे प्रकार यांचे इतर प्रकार शोधून त्यांची यादी बनविण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय – परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 10

समजून घेऊ या : पाण्याचे गुणधर्म ।

संदर्भ : इ.3री, पाठ 10 पाण्याविषयी थोडी माहिती

सराव करू या :

1. योग्य शब्द लिहा.

अ………………….पाण्याला रंग, वास आणि चव नसते. (शुध्द / गढूळ)

. ब. पाणी…………………आहे. (पारदर्शक / अपारदर्शक)

2. दिवसा पाहिले असता समुद्राचे पाणी निळसर रंगाचे का वाटते? ते लिहा.

3. पाण्यात पडलेला खिळा आपल्याला का दिसतो, ते लिहा.

4. चूक की बरोबर ते लिहा.

अ. पाण्यात मीठ विरघळत नाही…………………..

ब. पाण्याला स्वतःचा आकार नसतो. ……………….

क. शुद्ध पाण्याला निळसर रंग असतो………………..

 विषय –  परिसर अभ्यास  

करून पाहूयात –

1. एका स्टुलावर एक मेणबत्ती पेटवून ठेवा

…………………………………..

2. ती एका पुठ्यातून बघा

…………………………………..

3. तीच मेणबत्ती आता काचेतून बघा

…………………………………..

या प्रश्नांची उत्तरे शोधू – –

१. पाण्याला रंग असतो काय ?

…………………………………..

२. पाणी नसेल तर उद्योग सुरू करता येईल काय ?

…………………………………..

३. पाणी थंड केले की त्याचे काय होते ?

…………………………………..