♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस आठवा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस आठवा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

१) शिक्षकांनी या खेळाविषयी सविस्तर नियम समजावून सांगावे.

२) नाव / शब्द तोडणे हा खेळ वर्गातील मुलांची नावे घेवून खेळायचा आहे.

३) ज्या मुलाचे नाव घेऊन खेळ खेळणार आहात त्या मुलाला पुढे बोलवा.

४) प्रथम सोपी नावे घ्या.

५) शिक्षक एका विद्यार्थ्याचे नाव घेतील. उदा. रवी (एक अक्षर एक टाळी याप्रमाणे दोन अक्षरी

रा-वी असे तोडून म्हणत दोन टाळ्या वाजविणे).

६) वरील प्रमाणे दोन, तीन, चार व पाच अक्षरी अशी अक्षरांची संख्या वाढवत नावे / शब्द तोडणे या खेळांचा सराव घ्यावा. (उदा. चेतन, सौदामिनी, जयप्रकाश )

७) नाव / शब्द जोडूया हा खेळ घेताना प्रथम वर्गातील दोन अक्षरी नाव असलेल्या मुलाला पुढे बोलवा.

८) प्रथम त्या मुलाचे नाव न सांगता नाव तोडून म्हणा. उदा. र-वी असं नाव तोडून म्हणा व प्रत्येक अक्षरासाठी प्रत्येक अक्षर म्हणत असतानाच टाळी वाजवा. नंतर नाव पूर्ण जोडून म्हणून एकच टाळी वाजवा.

सक्षम बनूया –

१) शिक्षकांनी शब्द हा अक्षरांचा तयार झालेला असतो हे मुलांच्या लक्षात आणून द्यावे. २) एक अक्षर म्हटले की लगेचच एक टाळी याकडे लक्ष केंद्रीत करा. (उदा. राजवीर-रा-ज-वी-र असे चार अक्षरी नाव म्हणताना बरीच मुले दोन-तीन टाळ्या वाजवतात. अशावेळी मुलांकडूनच सावकाश टाळ्या वाजवून घेऊन, मुलांना दुरुस्त करायला मदत करणे. प्रत्येक वेळी मुले प्रत्येक अक्षराला टाळी बरोबर वाजवत आहे ना याकडे लक्ष ठेवा.)

३) शिक्षक आता एकेका मुलाला पुढे बोलावतील व त्याच्या नावाचा वरीलप्रमाणे शब्द जोडणे हा खेळ घेतील.

४) खेळ घेत असताना प्रत्येक मूल अक्षर म्हणत असतानाच टाळी वाजवत आहे ना ही काळजी घेतील.

सराव करू या.

१) शिक्षकांनी विविध नावांचे / शब्दांचे उदाहरण देऊन मुलांचा जितकी अक्षरे तितक्या टाळ्या

हा संबोध दृढ करावा.

२) तीन, चार व पाच अक्षरी अशी अक्षरांची संख्या वाढवत नाव / शब्द जोडणे या खेळाचा सराव

घ्यावा.

३) आता सराव करताना विविध वस्तूंसाठीही घ्या. प्रथम वस्तूंच्या नावांची यादी फळ्यावर

लिहा. ( यादी 4 ते 6 शब्दांची असावी, जास्त मोठी नको.)

जसे- पाटी

पुस्तक

दरवाजा

खोड रबर

उदा. पा-टी असं तोडून म्हणताना प्रत्येक अक्षर म्हणत असतानाच टाळी वाजवा. दोन अक्षरांसाठी दोन टाळ्या वाजवायच्या व लगेचच पाटी जोडून म्हणून एकच टाळी वाजवायची. ४ ) वरीलप्रमाणे उर्वरित एकेका शब्दाचा शब्द जोडणे खेळ घ्या.

कल्पक होवूया

१)वर्गातील सर्व मुलांची नावे घेवून जितकी अक्षरे तितक्या टाळ्या हा खेळ खेळा.

२) घरी गेल्यावर घरातील व्यक्तींची नावे घेवून हा खेळ खेळा.

३ ) मुलांच्या मदतीने घरातील वस्तूंच्या नावांची शब्द यादी फळ्यावर करून घ्या.

४) शब्द लिहून झाल्यावर एकेक करून शब्द जोडणे-तोडणे खेळ घ्या.शब्द म्हटल्यानंतरकिती टाळ्या वाजवल्या व शब्दात किती अक्षरे आहेत ते विचारा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Match the following letters.