पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस सातवा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊया!
तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेल्या गोष्टी व स्वतः वाचलेल्या गोष्टी यांची यादी करा. गटात व मित्रांना ही यादी वाचून दाखवा. गटात तुम्हा सगळ्यांना माहित आहेत अशा गोष्टींची एक नवीन यादी तयार करा.
एक होता कावळा आणि एक होती चिमणी. चिमणीचे घर होते मेणाचे आणि कावळ्याचे घर होते शेणाचे. ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल. या गोष्टीचा शेवटही तुम्हाला माहित असेल. समजा आपण या गोष्टीचा शेवटच बदलला तर….
जसे की: चिमणीने मुसळधार पावसात कावळेदादाला आपल्या घरात आश्रय दिला. पावसाळा संपेपर्यंत कावळेदादा चिऊताईच्या घरात राहिला. पावसाळा संपला कावळेदादा भुर्रर उडून गेला.. दिवस असेच निघून गेले आणि आता आला उन्हाळा. सूर्य तळपू लागला. सारी सृष्टी तापू लागली. बिचाऱ्या चिऊताईचे मेणाचे घरटे वितळू लागले. चिऊताईला फार दु:ख झाले. ती रडू लागली. इतक्यात तेथे कावळेदादा आला आणि म्हणाला, ” चिऊताई, अगं काळजी कशाला करतेस? माझं शेणाचं नवीन घरटं बनवलंय की मी पुन्हा. येशील का माझ्या घरट्यात राहायला?”
#सक्षम होऊ या!
शिक्षकांसाठी सूचना- शिक्षकांनी अशाप्रकारे मुलांना माहित असणाऱ्या गोष्टींची सुरुवात, शेवट, गोष्टीचा मध्य बदलून मुलांना नवीन गोष्टी बनविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, मदत करावी, मार्गदर्शन
करावे.
+ सराव करू या!
तुम्ही ऐकलेली किंवा वाचलेली एक गोष्ट आठवा. त्या गोष्टीत तुम्हाला आढळलेल्या बाबी पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
Example –
1) How do you feel when someone teases you?
2) How do you feel when you get a new dress?
3) How do you feel when you go to school?
4) How do you feel when you lose a pen?
6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:
Use the following expressions and frame simple dialogues.
Oh!
Alas!
Oh my goodness
Hurrah!
Bravo!
Congratulations!
Oh no!
Excellent!
Well-done! Great!
विषय -विज्ञान
कृतिपत्रिका : 07
समजून घेऊ या : अन्नबिघाड, अन्ननासाडी, अन्नरक्षण, अन्नभेसळ
संदर्भ : इयत्ता 7 वी प्रकरण 5 अन्नपदार्थांची सुरक्षा
अध्ययन निष्पती : अन्नबिघाडाची कारणे ओळखता येणे, अन्ननासाडी होऊ नये यासाठी उपाय सुचविणे.
विषय – इतिहास ना.शास्त्र
पहिले काही बाबी आठबूया :-
1) तुला माहित असलेला शिवाजी महाराज व अफजलखान भेटीच्या प्रसंगाचे वर्णन कर.
…………………………………..
2) रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली ?
…………………………………..
3) तुला आठवत असलेली शिवाजी महाराजंच्या कार्याची थोरवी विषद कर.
.…………………………………..
1) एका शब्दांत लिह.
★ स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी
* शिवाजी महाराजावर काव्य रचणारा तमीळ कवी
…………………………………..
* बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा
…………………………………..
* पोवाड्यातून शिवाजी महाराजांची महती सांगणारा
…………………………………..
2) चौकटीत दिलेला उताऱ्याचे वाचन करून तुझ्या शब्दांत तो लिह.
1) शिवाजी महारांजाच्या महतीवर खालील व्यक्तींनी काय केले ते तू सांग
अ) लोकमान्य टिळक ……………………………
आ) लाल लजपतराय……………………………
इ) सुब्रमण्यम भारती……………………………
ई) रवींद्रनाथ टागोर……………………………
उ) सर जदुनाथ सरकार ……………………………
2) शिवाजी महाराज यांच्या बद्दल googal किवा ग्रंथा वापर करून पोवाडा लिही.
विषय – भूगोल
* थोडे आठवूया !
1) सागरी प्रवाह म्हणजे काय?
…………………………………
2) पुढील विधानेतपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा.
…………………………………
1. तापमानातील बदल, पाण्याच्या घनतेतील बदल व वारे यांमुळे सागरी प्रवाह निर्माण होत नाहीत.
…………………………………
॥ सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुवीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहतात.
…………………………………
वरील नकाशा चे निरीक्षण करा.
1) कोणकोणत्या किनारपट्टीच्या भागांत तापमानात फरक पडेल? अशा किनारपट्टीची नावे सांगा.
………………………
2) किनारी प्रदेशात तापमानात फरक पडण्याचे कारण काय असेल?
………………………