♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

Motorola Edge+: Motorola Edge+ स्मार्टफोन १९ मे रोजी भारतात लाँच होणार – motorola edge+ india launch set for may 19, flipkart teaser reveals

[ad_1]

नवी दिल्लीः मोटोरोला कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन एज प्लस (Motorola Edge+) ला भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे. या स्मार्टफोन संबंधी ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर एक टीझर जारी केला आहे. ज्यात ही माहिती दिली आहे. मोटोरोला एज प्लस स्मार्टफोनला भारतात १९ मे रोजी लाँच करण्यात येणार आहे. याआधी कंपनीने या फोनला ग्लोबल बाजारात लाँच केले होते.

वाचाःVivo V19 चा आज भारतात सेल, ‘या’ ऑफर्स मिळणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोटोरोला एज प्लस स्मार्टफोनची किंमत ७५ हजार हजार ते ८० हजार रुपयांदरम्यान असू शकते. तसेच हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येवू शकणार आहे. या फोनची खरी किंमत किती असू शकते याची माहिती फोन लाँच झाल्यानंतर उघड होणार आहे. मोटोरोलाने जागतिक बाजारात Motorola Edge,, Motorola Edge+ हे दोन स्मार्टफोन लाँच नुकतेच लाँच केले होते.

वाचाःमस्तच! जिओच्या नव्या प्लानमध्ये तब्बल २५२ GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

Motorola Edge+ चे वैशिष्ट्ये

मोटोरोला एज प्लस या फोन एक सिंगल सिम स्लॉटचा हा स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. या फोनमध्ये ६.७ इंचाचा एचडी प्लस ओलेड कर्व्ड डिस्प्ले दिला आहे. जे ९० एचझेड रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये १२ जीबी रॅम दिला आहे. कंपनीने या फोनमध्ये ३.५ एमएम जॅक दिला आहे.

वाचाः वनप्लस ८, वनप्लस ८ प्रोचा १८ मे रोजी स्पेशल सेलवर ही ऑफर

फोटोग्राफीसाठी यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. फोनचा मेन कॅमेरा ६ के व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि एक टाईम ऑफ फ्लाइट सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये २५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. १८ वॅट फास्ट चार्जिंग आणि १५ वॅट वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

वाचाः वनप्लस ८, वनप्लस ८ प्रोचा १८ मे रोजी स्पेशल सेल, ऑफर्स मिळणार

[ad_2]

Source link