[ad_1]
या ऑफर्स मिळणार
ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर जिओकडून ४० हजार रुपयांपर्यंतचे बेनिफीट, वन टाइम स्क्रीन रिस्प्लेसमेंट आणि नो कॉस्ट ईएमआय यासारखे ऑफर्स मिळणार आहेत. तसेच एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक आपल्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड युजर्संना या फोन खरेदीवर १० टक्के कॅशबॅक देणार आहे. ही ऑफर्स ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही ग्राहकांसाठी आहे.
Vivo V19 ची किंमत – फीचर्स
कंपनीने भारतात या फोनला ८ जीबी प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये उतरवले आहे. या फोनची किंमत २७ हजार ९९० रुपये ठेवण्यात आली आहे. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३१ हजार ९९० रुपये आहे. हा फोन ब्लॅक आणि सिल्वर कलरमध्ये उपलब्ध असणार आहे.
वाचाः वनप्लस ८, वनप्लस ८ प्रोचा १८ मे रोजी स्पेशल सेलवर ही ऑफर
Vivo V19 ची खास वैशिष्ट्ये
अँड्रॉयड १० वर काम करणाऱ्या या फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१२ प्रोसेसर, ८ जीबी रॅम पर्यंत आणि २५६ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा रियर सेटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचे चार लेन्स दिले आहेत. कॅमेऱ्यात नाइड मोड, अल्ट्रा स्टेबल व्हिडिओ, आर्ट पोर्ट्रेट व्हिडिओ आणि सुपर मायक्रो यासारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
वाचाः करोना विरुद्ध लढाईः जिओफोनमध्ये आरोग्य सेतू अॅप
३२ मेगापिक्सलचा ड्युअल सेल्फी कॅमेरा
या फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा दिला आहे. यात ३२ मेगापिक्सलचा आणि ८ मेगापिक्सलचे असे दोन सेन्सर असणार आहेत. फ्रंटला कॅमेऱ्यात सुपर नाईटी सेल्फी, सुपर वाइड अँगल सेल्फी आणि अल्ट्रा स्टेबल व्हिडिओ यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये ३३ वॅट फ्लॅश चार्ज २.० सोबत ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
वाचाः वनप्लस ८, वनप्लस ८ प्रोचा १८ मे रोजी स्पेशल सेल, ऑफर्स मिळणार
[ad_2]
Source link