[ad_1]
लॉकडाउनमध्ये शाळांना सुट्टी मिळाल्यानं कोट्यवधी मुलांना घरीच थांबावं लागलं. त्यानंतर अंदाजे १४ वर्ष वयाच्या आतील मुलांच्या हातात मोबाइल मोठ्या प्रमाणावर दिसू लागला. परिणामी, मुलांच्या अॅप्सच्या डाउनलोडिंगचं प्रमाण वाढलं. एप्रिल महिन्यात युट्युब किड्सचं जगभरातील डाउनलोडिंग १ कोटी ६० लाखांनी वाढलं. यातील पावणेदोन कोटी डाउनलोडिंग हे भारतातून असल्याचं गुगल आणि अॅपलच्या अहवालात समोर आलंय. याचबरोबर गुगल क्लासरूम हे अॅप दुसऱ्या स्थानावर आहे. एप्रिल महिन्यात या अॅपचे सुमारे २८ कोटी २० लाख डाउनलोडिंग झालं आहे. यातील तीन कोटी डाउनलोडिंग हे एकट्या भारतातून झालंय. गुगल क्लासरूमबरोबरच, युट्यूक किड्स, ड्युओलिंगो आणि फोटोमॅथ या लहान मुलांच्या अॅपचं सर्वाधिक डाउनलोडिंग झाल्याचं समोर आलंय. याचा वापर सध्या इतका वाढलाय की लहान मुलांच्या अॅप्सच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. यात युट्यूब किड्स आघाडीवर असून हे अॅप डाउनलोड करणाऱ्यांचं प्रमाण तब्बल सहा पटीनं वाढल्याचं समोर आलंय.
ऑनलाइलन आशयाचा वापर लॉकडाउनच्या काळापासून वाढू लागला आहे. या कालावधीत व्हिडीओ ऑन डिमांडचं प्रमाण ७८ टक्क्यांनी वाढलंय. २०१९च्या तुलनेत २०२० मध्ये लहान मुलांसाठी ओटीटीच्या वापरात ३० टक्क्यांनी वाढ झालीय. यात लहान मुलांसाठीच्या चित्रपटांना मोठी मागणी असल्याचंही समोर येतंय. ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले टॉप १० लहान मुलांचे चित्रपट हे ५० टक्के वेळा मोबाइलवर पाहायला मिळाल्याचं ‘बार्क’च्या ताज्या अहवालात समोर आलंय.
कार्टूनला पसंती
ओटीटी प्लॅटफॉर्मवर डोरेमॉन या लहान मुलांच्या कार्टून मालिकेला मोठी मागणी असल्याचं दिसून आलंय. डोरेमॉनची मागणी तब्बल २६ टक्क्यांनी वाढली. तर छोटा भीमची मागणी १९ टक्क्यांनी वाढल्याचं यात समोर आलंय. यामुळेच सध्या टीव्हीवर लहान मुलांच्या वाहिन्यांना सर्वाधिक पसंती असून ते पाहण्याचं प्रमाण ८१ टक्क्यांनी वाढलंय.
मर्यादित कंटेंट
सध्या सहा ते १४ या वयोगटासाठी उपलब्ध असलेला कंटेंट हा मर्यादित आहेत. यात कला आणि कार्यानुभव यासारख्या विषयाला वाहिलेल्या आशयाचं प्रमाण २ टक्केच आहेत. तर माहितीपर मनोरंजनाचं प्रमाण एक टक्का आहे. तर चित्रपटांचं प्रमाणही कमी असल्यानं या वयोगटातील मुलांना मनोरंजनासाठी धडपड करावी लागत आहे. परिणामी या वयोगटातील ७५ टक्के पालक मुलांना बैठ्या खेळांमध्ये रमवत असल्याचंही पाहणीतून समोर आलं आहे.
० व्हिडीओ ऑन डिमांड ७८ टक्क्यांनी वाढलं
० लहान मुलांसाठीच्या ओटीटी वापरात ३० टक्क्यांनी वाढ
० ओटीटीवर डोरेमॉन कार्टून मालिकेला मोठी मागणी
० छोट्यांचा स्क्रीन टाइम सरासरी ७० मिनिटं
[ad_2]
Source link