इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 40
विषय – विज्ञान कृतिपत्रिका
कृतिपत्रिका 24
समजून घेऊ या चुंबक, चुंबकत्व, शोध, चुंबकीय पदार्थ, अचुंबकीय पदार्थ,
संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 15 चुंबकाची गंमत.
अध्ययन निष्पत्ती : शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा दैनंदिन जीवनात वापर करतात. लक्षात घेऊ या :
ज्या पदार्थाकडे लोखंड, कोबाल्ट, निकेल इत्यादींपासून बनवलेल्या वस्तू आकर्षिल्या जातात म्हणजेच चिकटतात अशा पदार्थाला चुंबक म्हणतात. पदार्थाच्या या
गुणधर्माला चुंबकत्व म्हणतात.
चुंबक वस्तू आकर्षून घेते म्हणजे चुंबकीय बलामुळे त्या वस्तूचे विस्थापन होते. कारखाने, बंदर, कचरा डेपो अशा ठिकाणी मोठ्या वस्तूंची हलवाहलव करावी लागते. त्यासाठी केवमध्ये चुंबक वापरतात. चुंबकीय बलामुळे कार्य होते. यावरून चुंबकत्व ही एक प्रकारची ऊर्जा आहे हे आपल्या लक्षात येते.
चुंबकाचा शोध मॅग्नेशिया येथे लागला. मॅग्नेटाइट या खडकामध्ये चुंबकाचे गुणधर्म आढळले. यालाच ‘लोडस्टोन’ असेही म्हणतात. अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी या खडकांचा वापर होऊ लागला. यातूनच पुढे होकायंत्राची निर्मिती झाली.
खालील लिंकला क्लिक करून होकायंत्राबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.
चकती चुंबक, पट्टी चुंबक, वर्तुळाकार चुंबक, नालाकृती चुंबक. असे विविध आकाराचे चुंबक असतात. हे करून पहा एका बशीमध्ये टाचण्या, वाळू, झाडाची पाने, कागदाचे कपटे (तुकडे), लाकडाचा भुसा, लोखंडाचा किस घेऊन त्यावर चुंबक फिरवा. तुम्हाला टाचण्या व लोखंडाचा किस चुंबकाला चिकटलेला दिसेल. जे पदार्थ चुंबकाला चिकटले त्यांना ‘चुंबकीय पदार्थ’ म्हणतात. जे पदार्थ चुंबकाला चिकटले नाही, (कागदाचे कपाटे, झाडाची पाने, लाकडाचा भुसा, वाळू) त्यांना ‘अचुंबकीय पदार्थ’ म्हणतात. लोह, कोबाल्ट, निकेल हे धातू चुंबकीय पदार्थ आहेत.
5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास
सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी