♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 33

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस 33

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 


कृतिपत्रिका : 17

समजून घेऊ या ऊर्जेची रूपे, यांत्रिक ऊर्जा, गतिज ऊर्जा, उष्णता ऊर्जा. संदर्भ: इयत्ता सहावी प्रकरण । कार्य आणि ऊर्जा.

अध्ययन निष्पत्ती: दैनंदिन जीवनात शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा वापर करणे. लक्षात घेऊया:

यांत्रिक ऊर्जा यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा’ असे म्हणतात. स्थितिज ऊर्जा व गतिज ऊर्जा असे यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत. स्थितिज ऊर्जा स्थिती मुळे तर गतिज ऊर्जा गतीमुळे प्राप्त होते.

स्थितिज ऊर्जा : स्थितिज ऊर्जा वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवलेल्या ऊर्जेला ‘स्थितिज ऊर्जा’ म्हणतात.

गतिज ऊर्जा गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला ‘गतिज ऊर्जा’ असे म्हणतात. उदाहरणार्थ कॅरम खेळताना गोटी व स्ट्रायकरना ऊर्जा दिल्यावर दोन्ही वस्तूंना गती प्राप्त होते.

सराव करूया :

  1. शोध घ्या खालील चित्रामध्ये धरणातील साठवलेले पाणी व धरणातील नदी प्रवाहामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा आढळून येते याचा शोध घ्या.
  2. पृथ्वीवरील वातावरणाला सूर्याची कशा प्रकारे मदत होते ते लिहा.
  3. सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो?
  4. ऊर्जा स्त्रोत कशाला म्हणता येईल ?


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी