♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 32

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस 32

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 

कृतिपत्रिका 16

समजून घेऊ या कार्य, ऊर्जा, कार्य आणि ऊर्जा संबंध.

संदर्भ इयत्ता सहावी प्रकरण 11 कार्य आणि ऊर्जा.

अध्ययन निष्पत्ती : दैनंदिन जीवनात शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा वापर करतात.

लक्षात घेऊ या :

जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा त्याला कार्य झाले असे म्हणतात.

सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी ज्या कार्यास जास्त बल लागते ते कार्य अधिक असते, सारखेच बल

लावून जास्त विस्थापन झाले तर ते कार्यही अधिक असते.

सारखेच बल वापरले असताना जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक असते म्हणजेच कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले विस्थापन या दोन्ही चा विचार करावा लागतो.

कार्य ऊर्जा संबंध:

कार्य करण्याच्या क्षमतेला ‘ऊर्जा’ म्हणतात. ऊर्जेचे रूपांतर बलामार्फत कार्यात होते.

सराव करू या :

1. जरा डोके चालवा:

खालील चित्र पाहून विस्थापन कार्य व बल यांचा परस्पर संबंध थोडक्यात लिहा.

2. योग्य पर्याय निवडा.

(a) पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे…………………. होय. (ऊर्जा, विस्थापन, बल)

(b) एका मजुराने चार पाटया खडी 100 मीटर अंतरावर वाहून नेली, जर त्याने दोन पाट्या खडी 200 मीटर अंतरावर वाहून नेली तर……………………. कार्य घडेल. (समान, अधिक, कमी)

3. जरा डोके चालवा:

1. प्रत्येक क्रिया करताना बल लावणे आवश्यक आहे का ?

2. बलामार्फत कार्यात रूपांतर होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?

4. काय सांगाल ?

a) विस्थापन झाले असे केव्हा येईल ?

b) कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागतो ?


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी