♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 37

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 37

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास


कृतिपत्रिका : 21

समजून घेऊया व्यवस्थापनाचे महत्त्व व गरज

संदर्भ : इयत्ता चौथी प्रकरण 21, समूहजीवनासाठी व्यवस्थापन

अध्ययन निष्पत्ती : गटात एकत्र काम करत असताना एकमेकांविषयी आस्था, समानानुभूती व नेतृत्वगुण या बाबींमध्ये पुढाकार घेतात व सक्रिय सहभाग घेतात. उदा. वर्गातील (Indoor) / वर्गाबाहेरील (Outdoor) / स्थानिक / समकालीन उपक्रम आणि खेळ तसेच वनस्पतींची काळजी घेणे, पशू पक्ष्यांना खायला देणे. भोवतालच्या वस्तू / वडीलधारे / दिव्यांग यांच्यासाठी प्रकल्प करणे / भूमिका करतात. लक्षात घेऊया :

व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापन कधी करावे? व्यवस्थापनाची गरज कोठे लागते? त्याचे महत्व काय? याबाबत शिक्षक विद्यार्थ्यांशी चित्राद्वारे प्रसंगाद्वारे चर्चा घडवून आणतील.

आता मुलांनो, पुढील चित्र पहा. चित्रावर आधारित पुढील प्रसंग वाचा प्रसंगातून काय जाणवते हे शिक्षकांना सांगा.

श्रद्धा, आयेशा आणि एमिली या तिघींच्या कुटुंबियांनी उन्हाळी सुट्टीत सहलीला जायचे ठरवले, त्यासाठी त्यांनी खास गाडी ठरवली. सहलीच्या दिवशी सकाळी सर्वजण बराच वेळ गाडीची वाट पहात राहिले, पण गाडी काही आलीच नाही, फोनवर चौकशी केल्यावर कळले की, गाडी चालकाला सर्वजण कोठे थांबणार हे माहीतच नव्हते. हा गोंधळ कशामुळे झाला? तर व्यवस्थापन नसल्याने !

कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते, म्हणजेच आपण काम कसे करणार? कधी करणार? याचा आराखडा तयार करणे म्हणजे ‘व्यवस्थापन’.

व्यवस्थापन महत्त्व व गरज-वरील प्रसंगात काय घडले तर व्यवस्थापनाचा अभाव! व्यवस्थापन असते तर कोणताही गोंधळ झाला नसता. म्हणजेच कोणतेही काम करताना व्यवस्थापन असेल तर काम सोपे होते! आपण जर कोणतेही काम इतरांबरोबर करणार असू तर त्याबाबत आराखडा करावा लागतो. हा आराखडा अधिक काटेकोरपणे करावा लागतो. कोणते काम कोणी करायचे, कसे करायचे हे प्रत्येकास समजावून सांगावे लागते. प्रत्येकजण काम नीट

करीत आहे की नाही यावर देखरेख करावी लागते. कामासाठी किती खर्च येईल याचा अंदाज बांधावा लागतो. या सर्व गोष्टी नेमकेपणाने पार पडल्या तर काम पूर्ण होते, यात एकाने जरी चूक केल्यास काम नीटपणे पूर्ण होत नाही.

मग, तुमच्या घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले तरीसुद्धा त्याचे व्यवस्थापन करावे लागते. उदा. जेवायला कोणते पदार्थ बनवायचे? त्यासाठी कोणते सामान लागेल? ते घरात आहे की विकत आणावे लागेल? पाहुण्यांचे स्वागत कसे करावे? ही आपली घरातील अशा छोट्या छोट्या कार्यक्रमात जर व्यवस्थापन असेल, तर शाळा, गाव, जिल्हा, राज्य व देश अशा सर्वच ठिकाणी व्यवस्थापन किती महत्वाचे व गरजेचे असेल! मग असे व्यवस्थापन कोठे कोठे करता येईल? तर तुमचा अभ्यास, व्यवस्थापन, वर्ग व्यवस्थापन, शाळा व्यवस्थापन इ. बाबतीत व्यवस्थापन बेहमी झाल्यास काम व्यवस्थित पार पडते, कोणताही गोंधळ होत नाही.

सराव करू या :

प्र. 1) घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले आहे. त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल ? ते पुढे लिहा.

1) उदा. जेवायला कोणते पदार्थ बनवायचे.

2)

3)

प्र. 2) तुमच्या घरी, परिसरात कोणकोणते कार्यक्रम व्यवस्थापन करून साजरे होतात ?


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी