♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 36

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 36

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास

कृतिपत्रिका : 20

समजून घेऊया विशेष गरजा असलेल्या व्यक्ती, संवेदनशीलता संदर्भ: इयत्ता चौथी प्रकरण 20, माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता

अध्ययन निष्पत्ती : गटात एकत्र काम करत असताना एकमेकांविषयी आस्था, समानानुभूती व नेतृत्वगुण या बार्बीमध्ये पुढाकार घेतात व सक्रिय सहभाग घेतात. उदा. वर्गातील (Indoor) / वर्गाबाहेरील (Outdoor) / स्थानिक / समकालीन उपक्रम आणि खेळ परस्पर सहकार्याने खेळतात, भोवतालच्या वस्तू / वडीलधारे / दिव्यांग यांच्यासाठी प्रकल्प करणे / भूमिका करतात, लक्षात घेऊया :

विशेष गरजा असलेल्या व्यक्ती जन्मत: आजारपण किंवा अपघातामुळे आपल्यापैकी काही व्यक्तींना शारीरिक अपंगत्व येते. सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना अनेक अडचणी आणि गैरसोईवर मात करावी लागते. त्यामुळे त्यांना विशेष सेवा सुविधा आणि मदतीची गरज असते.

मुलांनो, विशेष गरजा मध्ये अनेक प्रकार येत असतात. शारीरिक अपंग व्यक्तींना दिव्यांग म्हणतात. तुम्ही तुमच्या शाळेत परिसरात अशा व्यक्ती नेहमी पहात असाल. यामध्ये मुकबधीर, कर्णबधीर, दृष्टीहीन, पायाने अधू इत्यादी… बरोबर नं!

चित्रात दिसतात त्याप्रमाणे, रस्त्यावरून जाताना हातात पांढरी काठी घेऊन चाललेली एखादी व्यक्ती तुम्ही गावात, शहरात पाहिली असेल, त्या पांढऱ्या काठीच्या मदतीने दृष्टीहीन व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरू शकते. काही ठिकाणी ब्रेल लिपीमध्ये लिहलेले असते, त्याचाही वापर ह्या व्यक्ती आपल्या सोईसाठी करतात. (उदा. मतदान यंत्र, लिफ्टपाशी मजले क्रमांक). पायाने किंवा शरीराने अधू असणाऱ्या व्यक्तींसाठी शाळा-महाविद्यालय, स्टेशन इ. ठिकाणी उताराचा / चढणीचा रस्ता असतो. तर कर्णबधीर व्यक्तींसाठी खुणांची भाषा असते. विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती म्हणजे त्या इतर कोणी नसून त्या सर्वसामान्य व्यक्तींसारख्याच आहेत, त्यांच्यात भेदभाव करू नये. आपल्या समाजात विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती आपल्या दिव्यांगत्वावर मात करून पुढे गेल्या आहेत. (उदा. नर्तिका – सुधा चंद्रन, संगीतकार रविंद्र जैन, जलतरणपटू शरद गायकवाड)



5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी