इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 32
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास
evs-kruti-setu-
कृतिपत्रिका १६
समजून घेऊ या माहिती व संप्रेषण साधने, संगणकाचे भाग.
संदर्भ : तंत्रज्ञान क्षेत्र (इयत्ता दुसरीच्या ‘खेळ, करु, शिकू या पाठ्यपुस्तकातील पृ.क्र.६०) आणि संगणकाच्या करामती (इयत्ता दुसरीचा भाषा विषयाचा पाठ)
अध्ययन निष्पत्ती : संगणकाचे विविध भाग ओळखून बाह्य भागांची हाताळणी करतो.
लक्षात घेऊ या

बाजूच्या चित्रातील आजोबा वर्तमानपत्र वाचत आहेत. बाबा बोलण्यासाठी मोबाईलचा वापर करत आहेत. ताई माहिती मिळवण्यासाठी संगणकाचा वापर करत आहे. पत्र, संगणक, मोबाईल, वर्तमानपत्र, टीव्ही ही सर्व साधने माहिती व निरोप मिळवण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी वापरली जातात यांना माहिती व संप्रेषण साधने म्हणतात.

मॉनिटर, सी. पी.यू. कीबोर्ड, माऊस, प्रिंटर व स्पीकर हे संगणकाचे विविध भाग आहेत.

प्रश्न १) उत्तरे लिहा.
१) टेलिफोनचे कोणकोणते फायदे आहेत?
२) वर्तमानपत्रामुळे कोणती माहिती मिळते?
३) संगणकाचा वापर कोठे केला जातो ?
४) पूर्वी निरोप कसे पोचवले जात असत ?
प्रश्न २) हे करा.
१) एका पोस्टकार्डावर मजकूर लिहा व ते तुमच्या नातलगाला पाठवा.
२) तुमचा घरचा पत्ता व्यवस्थित लिहा व तो आईला दाखवा.
प्रश्न ३) कोण ते लिहा.
१) अधिक वेगाने काम करणारे यंत्र
२) गाणे ऐकवतो.
३) टाईप करतो.
४) माहिती साठवतो.
५) चित्र दाखवतो.
उपक्रम :
१) संगणकाचे चित्र काढा व रंगवा.
२) संगणकाविषयी अधिक माहिती मिळवा.
5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास
सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी