♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 36

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस 36

विषय  – इतिहास – भूगोल  

अध्ययन अनुभव / कृती

तु दुसऱ्या पाठात इतिहासाची साधने पहिली इतिहास समजावून घेण्यासाठी इतिहासाच्या काळाची विभागणी प्रामुख्याने दोन टप्प्यात केली जाते.

१. प्रागैतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात.

२. ऐतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात.

नवाश्मयुगात व्यापाराचे प्रमाण वाढत गेले, त्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी सांकेतिक खुणा व चिन्हांचा वापर सुरु झाला व त्यातूनच विविध लिपी अस्तित्वात आल्या. येथेच प्रागैतिहासिक काळ संपून ऐतिहासिक काळ सुरु झाला कारण लिखित पुरावे निर्माण होऊ लागले.

जीवसृष्टीमध्ये मानव व इतर प्राण्यांना स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी निसर्गावर अवलंबून रहावे लागते. प्राणी आपल्या गरजा पूर्ण करत असताना परिसर व निसर्ग यांच्यात बदल करत नाहीत. उदा. काही प्राणी गुहेतच राहतात. मिळणारे अन्नपदार्थ आहे त्याच स्वरुपात खातात. याउलट मानव परिसर व निसर्ग यात नेहमीच बदल करत राहतो. मानव गुहेतून घरात आला. कच्च्या अन्नपदार्थावर केले. अगदी माती, लाकूड, दगड, धातू यावरही संस्करण केले. उदा. लाकडापासून दरवाजा, टेबल बनवले. विविध धातूंपासून दागिने, भांडी, अवजारे, हत्यारे बनवत्नी कच्च्या अन्नपदार्थांपासून इतर अन्नपदार्थ बनवले. ऊसापासून साखर, गुळ,

मानव विविध पदार्थाचे स्वरूप स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतो. हे करण्यासाठी त्याला कौशल्यांची आवश्यकता असते, हवी ती वस्तू घडविण्यात आधी त्याला विचार करावा लागतो, ती वस्तू

प्रत्यक्ष घडवण्यासाठी त्याला श्रम करावे लागतात. विचार, कौशल्य आणि श्रम यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली. या कला आणि परंपरा यांचे ज्ञान प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीकडे सोपवली. त्यासाठी झालेल्या वैचारिक देवाणघेवाणीतून भाषा ही समृद्ध होत गेली. विविध कला कौशल्य आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजे संस्कृती होय.

नवाश्मयुगीन संस्कृती कृषिप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या. शेतीचे उत्पादन चांगले होण्यासाठी सुपीक जमिनीची आणि बारमाही पाणीपुरवठ्याची आवश्यकता असते. सहाजिकच नवाश्मयुगीन मानवाने नद्यांच्या काठांवर गावे वसवली. नद्यांच्या खोऱ्यामध्ये नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला. विविध कौशल्यांच्या आधारे उत्पादनातील वाढ, चाकाचा उपयोग, व्यापारातील भरभराट, विकसित लिपींचा उपयोग इत्यादी गोष्टींमुळे नवाश्मयुगीन संस्कृतीमधून नागरी संस्कृती उदयाला आल्या. जगातील चार प्रदेशांमध्ये साधारणपणे एकाच कालखंडात म्हणजे इ.स.पू. सुमारे ३,००० वर्षापूर्वी नागरी संस्कृती उदयाला आल्या. मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन हे ते चार प्रदेश होत. नद्यांच्या काठाने विकसित झाल्या म्हणून या प्रदेशांतील प्राचीन नागरी संस्कृतींना ‘नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती’ असे म्हणतात.

प्राचीन नागरी संस्कृतींची काही वैशिष्ट्ये

१. नट्यांच्या काठच्या कृषिप्रधान स्थिर वसाहती.

२. तांब्याचा आणि कासे या धातूचा वापर.

३. प्रगत तंत्रज्ञान आणि विशेष | व्यावसायिक कौशल्यांवर आधारित व्यवसाय.

४. पाण्याचे वाटप करणारी मध्यवर्ती यंत्रणा, विकसित सिंचनपद्धती.

५. शेतीचे आणि इतर वस्तूंचे नगरातील रहिवाशांच्या गरजेपेक्षा अधिक उत्पादन.

६. विकसित लिपीवर आधारित लेखनकला.

७. दूरवर पसरलेला व्यापार आणि प्रगत वाहतूक – प्राण्यांकडून ओढली जाणारी चाकाची वाहने, जलमार्गाचा उपयोग.

८. सुव्यवस्थित नगररचना – संरक्षक – तटबंदी, फरसबंद रस्ते. अधिकारी वर्ग आणि सामान्य जन यांच्या वेगवेगळ्या वसाहती.

९. प्रगत वास्तुशास्त्र आणि शिल्पकला.

१०. गणित, खगोलशास्त्र आणि वैदयक यांसारख्या शास्त्रांचा विकास.6. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठीLeave a comment