♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 36

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस 36

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 

कृतिपत्रिका 23

समजून घेऊया पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात, पदार्थाच्या अवस्था. : संदर्भ इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 24 ( पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा)

अध्ययननिष्पत्ती: निरीक्षणे, अनुभव, माहिती यांची सुनियोजित पद्धतीने नोंद करतात. (उदा. तके / आरेखन / स्तंभालेख / पाय चार्ट) व कृती या घटनेतील आकृतिबंधांचे भाकीत करतात. (उदा. तरंगणे, बुडणे, मिसळणे, वाष्पीभवन बीजांकुरण, खराब होणे) व यावरुन कारण व परिणाम यांतील परस्परसंबंध स्थापित करतात.

लक्षात घेऊ या

सांगा पाहू!

पुस्तकातील कोणताही थोड़ा मजकूर फळ्यावर खडूने लिहा. लिहून झाल्यावर खडूचे निरीक्षण करा.

खडूमध्ये कोणता बदल झालेला दिसला ? फळ्यावर लिहिलेले डस्टरने पुसा आणि डस्टर टेबलावर आपटा.तुम्हाला काय दिसले ? खडूचा आकार कमी झाला आहे आणि डस्टर आपटल्यावर डस्टरला चिकटलेले खडूचे कण खाली पडले. हे कण खडूच्याच रंगाचे आहेत. यावरून फळ्यावर खडूने लिहिले असता फळ्याला खडूचे कण चिकटले आणि फळा पुसल्यानंतर ते कण फळ्यापासून मोकळे झाले, हे समजले.

करुन पहा.

कोळसा किंवा खडीसाखरेचे तुकडे घ्या, खलबत्यात कुटा. ते तुमच्या काय लक्षात आले ? कोळसा किया खडीसाखर कुटली असता त्याची पूढ होते, म्हणजेच बारीक कण मिळतात.

आपल्या भोवतालचा प्रत्येक पदार्थ सूक्ष्म कणांपासून बनलेला असती. फरवतीने लाकूड कापताना लाकडाचा भुसा

म्हणजेच लाकडाचे कण खाली पडतात हे तुम्ही पाहिले असेल.

लोखंड किया तांबे कानशीने घासतानाही लोखंडाचे तांब्याचे कण सुटे होतात. पेन्सिल, खडू, कागद, लाकूड, गव्हाचे दाणे, लोखंड, तांबे, कोळसा असे सर्व पदार्थ सूक्ष्म कणापासून बनलेले असतात.

आपल्या डोळ्यांना पदार्थांचे जे लहान कण दिसतात ते देखील अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. हे कण एवढे लहान असतात, की ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. एखादया पदार्थाचा आपल्याला दिसू शकेल एवढा कण तयार होण्यासाठी त्या पदार्थाचे लाखो कण एकत्र असावे लागतात.

सांगा पाड

अचानक पाऊस सुरू झाला की आपण वळणीला उभे राहतो. अंगावर पाऊस पडत नसतानाही आपण काही प्रमाणात भिजतो. असे का बरे होते ?

पाणी जमिनीवर पडले, की त्याचे शिंतोडे उडतात. शिंतोडे म्हणजे पाण्याचे लहान थेंब. हे वही पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून बनले असतात. त्यामुळे आपल्याला भिजायला होते, म्हणजे द्रवपदार्थही कणाचेच बनलेले असतात.

डांबरगोळीचे सतत वायुरूपातील लहान कणांत रूपांतर होत असते. यामध्ये ठेवलेल्या महान कण

कपयांवर बसल्यामुळे त्यांना डांबरगोळीचा वास येतो. काही दिवसांनी या गोळ्या लहान लहान होत नाहीशा होतात. रांगोळीच्या कणांचा आकार पिठाप्रमाणे बारीक असतो. रांगोळीचे रंग लहान खड्यांच्या स्वरूपातही असतात.

पदार्थाच्या अवस्था:

निसर्गातील पाणी हे स्थायू, द्रव आणि वायू अशा तीन अवस्थांमध्ये आढळते. अवस्था बदलली तरी या तीनही अवस्थांमध्ये पाण्याचा प्रत्येक कण एकसारखा असतो, तथापि स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये त्यांची मांडणी वेगळी असते.

त्यामुळे बर्फ, पाणी आणि बाष्प यांच्या गुणधर्मातही फरक दिसून येतो. विसर्गात आढळणारे सर्व पदार्थ कणरूप असतात. सामान्यपणे प्रत्येक पदार्थ एका ठराविक अवस्थेत असतो. त्यावरून त्या पदार्थाला स्थायू, द्रव किया वायू पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ, अॅल्युमिनियम, कोळसा हे स्थायू आहेत. केरोसीन, पेट्रोल हे द्रव आहेत, तर बायट्रोजन ऑक्सिजन हे वायू आहेत. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. पदार्थांमध्ये कठीणपणा, पारदर्शकता, रंग, वास, चय, पाण्यात विरघळणे असे विविध गुणधर्म असतात.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment