पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस सोळा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांनावरील वरील शब्दांचे शब्दकार्ड दाखवून कार्डावरील शब्दांचे वाचन करून घ्यावे. शब्दकार्डावरील प्रत्येक शब्दाचे कोण कोणते अर्थ विद्यार्थ्यांना माहिती आहेत त्याविषयी चर्चा करावी. प्रश्न विचारून शब्दांचे अनेक अर्थ सांगण्याची संधी विद्यार्थ्यांना द्यावी. ते शब्द विद्यार्थांना लिहावयास सांगावे किंवा तोंडी विचारावे . शिक्षकांनी राहिलेल्या शब्दांचे अर्थ स्पष्ट करावे.
विषय – गणित
शाळेच्या वसतिगृहात एका खोलीत ४ विद्यार्थी याप्रमाणे एकूण ८४ विद्यार्थी राहतात. तर विद्यार्थ्यांना राहण्यासाठी किती खोल्या वापरल्या जातात ?
* एका बिस्कीट पुड्यात ७ बिस्किटे असे ४९० बिस्किटांचे किती पुडे होतील ?
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 16
समजून घेऊया : सूर्योदय व सूर्यास्त, लहान- मोठा दिवस
संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 16, दिवस व रात्र
अध्ययन विष्पत्ती : निरीक्षणे / अनुभव / माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध घटनांच्या आकृतिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (उदा. दिवस व रात्र)
प्र. 2) तुमच्या शब्दांत लिहा.
अ) दिवस व रात्र कशामुळे होतात?
प्र. 3) जरा डोके चालवा.
अ) अमावस्येला चंद्र आकाशात असतो, पण दिसत नाही. त्याचे कारण काय असेल ?
आ) उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरव्यात लवकर का परततात ?
विषय – परिसर अभ्यास
पहिले काही आठवूया :
१) एक दिवस, जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या?
२) कोंढाणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
३) शिवरायांचे निवडक सरदार कोण-कोण होते ?
आधी लग्न कोंढाण्याचे:-हा पाठ्यांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग – २) या पाठ्यपुस्तकात पान क्र.५४ व ५५ वर
आहे.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१) तानाजीच्या मुलाचे नाव काय होते?
२) तानाजी सूर्याजीला काय म्हणाला ?
.. ३) ‘आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे’ असे कोणी म्हणाले?
उपक्रम- तानाजीची कोंढाण्यावर चढाई हे प्रसंगचित्र तयार कर.