♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 8

इ  7 वी  सेतू अभ्यास दिवस  8 

विषय  – मराठी 

क्षेत्र लेखन  

विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील दररोज येणाऱ्या भाजीवाला, दुधवाला, फेरीवाला यांचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांचा आधार घेऊन माहिती लिहावी ( वरीलपैकी कोणत्याही एका व्यक्तीची माहिती लिहावी )

1 व्यक्तिचित्रण –(यामध्ये ती व्यक्ती कशी दिसते व्यक्तीचे वर्णन असावे )

2 स्वभाव   (या मुद्द्यांमध्ये व्यक्तीचा स्वभाव असावा )

3 लकबी    (या मुद्द्यांमध्ये व्यक्ती बोलते कशी  बोलताना कोणता विशिष्ट शब्द वापरते का  याची माहिती असावी )

4 जाहिरात करण्याची पद्धत   (ती व्यक्ती  वस्तू विकताना  कशा प्रकारे जाहिरात करते  याची माहिती असावी )

विषय  – गणित

बेरीज करा खाली एक उदाहरण सोडून दाखवलेले आहे त्याचा अभ्यास करा व त्या प्रमाणे खालील उदाहरणे सोडवा

खालील उदाहरणे सोडवा

खाली एक उदाहरण सोडून दाखवलेले आहे त्याचा अभ्यास करा व त्या प्रमाणे खालील उदाहरणे सोडवा

खालील उदाहरणे सोडवा

विषय  – इंग्रजी 

Activity – 8

खालील चार्ट मधील  शब्द व्यवस्थित वाचा 

या प्रश्नार्थक शब्दांचा वापर करून खालील माहितीच्या आधारे   प्रश्न तयार करा

विषय  – विज्ञान    कृतीपत्रिका 8

खालील माहिती वाचा त्याच्या खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहा 

स्निग्ध पदार्थ : तेल, तूप, लोणी अशा स्निग्ध पदार्थापासूनही आपल्याला ऊर्जा मिळते.

आपण खाल्लेल्या अन्नपदार्थांपासून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी एककाचा उपयोग केला जातो म्हणूनच अन्न पदार्थापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठीही किलो कॅलरी हे एकक वापरले जाते.

प्रथिने : वाढीसाठी, शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवनक्रियांसाठी आवश्यक असलेली प्रथिने कडधान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस, अंडी अशा अन्नपदार्थातून मिळते.

खनिजे, जीवनसत्त्वे : शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते. त्यांना खनिजे म्हणतात. रोगप्रतिकार व शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी खनिजे, जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते. हे घटक आपल्याला भाज्या व फळांपासून मिळतात.

अन्नातील स्रोत तसेच शरीरात कमतरता निर्माण झाल्यास कोणते आजार होऊ शकतात याची माहिती खाली दिली आहे.

जीवनसत्त्वे : जीवनसत्त्वे ही दोन प्रकारची असतात

1) जल-विद्राव्य जीवनसत्त्वे : ‘B’ व ‘C’ जीवनसत्त्वे पाण्यात विरघळतात म्हणजे ती जल-विद्राव्य आहेत. ती लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात म्हणून यांचा पुरवठा सतत होणे गरजेचे असतात. B1, B2, B3, B6, B9 व B12 हे जीवनसत्त्वांचे महत्वाचे प्रकार आहेत

ii) जल अविद्राव्य जीवनसत्त्वे : ही जीवनसत्त्वे पाण्यात विरघळत

नाहीत. ती स्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरातील ‘मेदात’ विरघळतात त्यांचा शरीरात साठा होतो. A, D, E, K जल-अविद्राव्य जीवनसत्त्वे आहेत.

प्र. 1. खालील प्रश्नाचे उत्तर आपल्या वहीत लिहा 

i) पोषण कशाला म्हणतात ?

उत्तर : ………………………………………….

ii) अन्नपदार्थापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी कोणते एकक वापरले जाते ?

उत्तर : ………………………………………….

iii) खनिजे कशाला म्हणतात ?

उत्तर : ………………………………………….

प्र. 2 तर काय होईल ?

i) शरीरामध्ये आयोडीनची कमतरता निर्माण झाली.

उत्तर : ………………………………………….

ii) जीवनसत्त्व A चा अभाव निर्माण झाला आहे.

उत्तर : ………………………………………….

प्र. 3 खालील परिस्थितीत तुम्ही कोणत्या अन्नघटकांचे सेवन कराल ?

उत्तर : ………………………………………….

1. बेरीबेरी हा आजार झाला आहे.

उत्तर : ………………………………………….

2. स्कव्ही आजाराची लक्षणे दिसत आहेत.

उत्तर : ………………………………………….

खालील पदार्थाचे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व जीवनसत्त्वे यामध्ये वर्गीकरण करा. (बटाटा, कडधान्य, तूप, पनीर, गहू, डाळी, मांस, पपई, दूध, अंडी, भाकरी, काकडी, संत्री, मासे, तेल, गाजर)

उत्तर : ………………………………………….

कर्बोदके …………………………………………

प्रथिने …………………………………………

स्निग्धपदार्थ  …………………………………………

खालील प्रश्नाचे उत्तर आपल्या वहीत लिहा 

१) स्थानिक शासन संस्थेचे प्रकार कोणते?

उत्तर: ………………………………………….

२) शहरी शासन संस्थेचे प्रकार कोणते पंचायत समिती व नगरपरिषदेची कार्य कोणती आहेत?

उत्तर: ………………………………………….

१) ग्रामपंचायतचा कारभार कसा चालतो?

उत्तर:………………………………………….

२) महानगरपालिकाचा कारभार कसा चालतो?

उत्तर:………………………………………….


१) पुढील अधिकारी व पदाधिकारी यांच्या भूमिकांची वर्णन तुमच्या शब्दात करा.

अ) जिल्हा परिषद अध्यक्ष :

उत्तर: ………………………………………….

आ) गट विकास अधिकारी :

उत्तर: ………………………………………….

इ) नगराध्यक्ष :

उत्तर: ………………………………………….

ई) महापौर :

उत्तर: ………………………………………….

विषय  – हिंदी

कौशल  श्रवण – भाषण 

आरोह-अवरोह के साथ कविता गायन करे  |

 जवाब लिखिए । 

१ कवि इसे उठाकर घर ले जाना चाहता हैं – 

जवाब :- ……………………………………….

२ कवि इस प्रकार से मित्रों के साथ नहाएंगे

जवाब :- ……………………………………….

३. नदी की स्वच्छता आप किस प्रकार करना चाहोगे

जवाब :- ……………………………………….