WhatsApp: WhatsApp वर या जबरदस्त फीचरचे पुनरागमन, घ्या जाणून – whatsapp brings back 30-second video support for status updates: report

[ad_1]

नवी दिल्लीः गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपने आपल्या स्टेट्स फीरचमध्ये बदल केला होता. व्हॉट्सअॅपने आपल्या स्टेट्सवर व्हिडिओची मर्यादा कमी करून ती १५ सेकंद केली होती. ही मर्यादा आधी ३० सेकंदाची होती. व्हॉट्सअॅप आता पुन्हा एकदा ही मर्यादा वाढवून ती ३० सेकंद करीत आहे. WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, WhatsApp चा लेटेस्ट बिटा मोड २.२०.१६६ मध्ये कंपनी हे फीचर पुन्हा आणत आहे.


वाचाः एअरटेलचा नवीन पॅक, एका दिवसात खर्च करा ५० GB डेटा

iOS युजर्संना थोडी वाट पाहावी लागणार
WhatsApp ने व्हिडिओ स्टेट्सची मर्यादा अँड्रॉयड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी कमी केली होती. आता कंपनी केवळ अँड्रॉयडसाठी ही व्हिडिओ मर्यादा वाढवत आहे. म्हणजेच iOS युजर्संना यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.

व्हॉट्सअॅपवर येतोय मेसेंजर रुम्स व्हिडिओ चॅट फीचर
फेसबुककडून गेल्या महिन्यात घोषणा करण्यात आली होती की, नवीन मेसेंजर रुम्स लवकरच युजर्संना व्हॉट्सअॅपवर मिळेल. त्यानंतर कंपनीने अँड्रॉयड अॅप बीटा व्हर्जनवर फीचरची चाचणी सुरू केली होती. आता ही माहिती समोर आली आहे की, स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅपमध्ये येण्याआधी मेसेंजर रुम फॉर व्हॉट्सअॅपच्या Whatsapp Web वर ते रोलआऊट करण्यात येईल. लवकरच या नवीन फीचरमुळे युजर्संसाठी व्हिडिओ कॉलिंगचा ऑप्शन दिसणार आहे.

वाचाः whatsapp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केले, असे जाणून घ्या

रिपोर्टमध्ये म्हटले की, या फीचरला आता पर्यंत रोलआऊट करण्यात आले नाही. तसेच भविष्यात अपडेट्स मध्ये हे सर्व युजर्संना मिळू शकणार आहे. मेन अॅपच्या स्मार्टफोनवर हे एक वेगळे फीचर म्हणून व्हॉट्सअॅपमध्ये समावेश करण्यात येणार आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, युजर्संला डॉक्यूमेंट्स आणि गॅलरी पर्यायासोबत एक नवीन आयकॉन मेसेंजर रुम्स सुद्धा दिसेल. युजर्सला पुढील महिन्यात हे पर्याय मिळू शकतील.

वाचाः BSNL युजर्ससाठी गुडन्यूज, प्रत्येक कॉलवर परत मिळणार पैसे

वाचाः शाओमी ते सॅमसंगपर्यंत लॉकडाऊनमध्ये हे स्मार्टफोन स्वस्त

[ad_2]

Source link

Leave a comment