WhatsApp: Jio Phone मध्ये whatsapp वापरणाऱ्यांसाठी खास स्टेट्स फीचर – whatsapp for jio phone is getting status feature: report

[ad_1]

नवी दिल्लीः जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप युजर्स सुद्धा आता स्टेट्स मेसेज पोस्ट करु शकतील. एका रिपोर्टनुसार, लवकरच जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप स्टेट्स फीचर येणार आहे. नवीन फीचर जिओ फोनमध्ये दिसणारे नवीन स्टेट्स हे एखाद्या अँड्रॉयड किंवा आयफोन मोबाइलप्रमाणेच दिसेल. रिलायन्स जिओच्या जिओ फोनमध्ये २०१८ मध्ये व्हॉट्सअॅपचे खास व्हर्जन लाँच केले होते. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी जुलैमध्ये KaiOS च्या सर्व फोनमध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट केले होते.

वाचाःचायनीज फोन खरेदी करायचा नाही?, हे पर्याय आहेत बेस्ट

जिओ फोनसाठी व्हॉट्सअॅप स्टेट्स फीचर आता गोल्ड स्टेजमध्ये आहे. म्हणजेच हे फीचर रोलआऊटसाठी तयार आहे. अँड्रॉयड सेंट्रल सोबत एका मुलाखतीती काईओएसमध्ये व्हॉट्सअॅप सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रमुख जो ग्रिनस्टीडने हा खुलासा केला आहे की, निश्चितपणे जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅपचा वार करणाऱ्या युजर्संना ही एक मोठी भेट ठरणार आहे.

वाचाःभारतीय अॅपची मोठी झेप, १२ कोटींहून अधिक डाऊनलोड

व्हाईस कॉल सपोर्ट आताच नाही
ग्रिनस्टीडने काईओएस मध्ये व्हॉट्सअॅप व्हॉईस कॉलिंग सपोर्ट्स बद्दल सांगितले. ते म्हणाले, अँड्रॉयड फोनमध्ये जानेवारी २०१५ पासून व्हॉट्सअॅप व्हाईस कॉलिंग फीचर उपलब्ध आहे. परंतु, काईओएएस ऑपरेटिंग सिस्टमध्ये व्हाईस कॉल सपोर्ट देणे हे आव्हानात्मक आहे. सध्या जिओ फोनमध्ये कॉलिंग सपोर्ट बद्दल कोणतीही स्पष्टता नाही.

डिसेंबर २०१८ मध्ये जिओ फोन युजर्संला व्हॉट्सअॅप सपोर्ट मिळाला होता. गेल्या वर्षी नोकिया 8110 4G फीचर फोनमध्ये व्हॉट्सअॅपचे हे व्हर्जन रोलआऊट केले होते. याच्या काही आठवड्यानंतर व्हॉट्सअॅपने आपला अॅप ऑप्टीमाईज केला होता. सर्व काईओएएस फोन्ससाठी उपलब्ध करुन दिले होते. लाँच नंतर दोन आठवड्यानंतर १ कोटीहून अधिक युजर्संनी व्हॉट्सअॅपला फीचर फोनमध्ये डाऊनलोड केले.

वाचाः whatsapp च्या कमाल ट्रिक्स, स्वतः बना ‘मेसेजिंग मास्टर’

वाचाःचायनीज अॅप्सची सुट्टी करायचीय?, आत्ताच करा इन्स्टॉल

वाचाःटाटा स्कायची सर्विस २ हजारांनी स्वस्त, ६ महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन

[ad_2]

Source link

Leave a comment