aarogya setu app: भारतीय अॅपची मोठी झेप, १२ कोटींहून अधिक डाऊनलोड – arogya setu: 5 crore new users in 13 days, more than 120 million downloads

[ad_1]

नवी दिल्लीःआरोग्य सेतू अॅप २ एप्रिल महिन्यात लाँच करण्यात आला होता. २ महिन्यात या अॅपची डाऊनलोड संख्या १२ कोटीहून अधिक झाली आहे. याप्रमाणे भारतात सर्वात जास्त डाऊनलोड करण्यात आलेल्या हेल्थ अॅप्समध्ये नंबर वन अॅप बनले आहे. सरकारने नुकतेच या अॅपला अँड्रॉयड युजर्ससाठी ओपन सोर्स केले होते. यानंतर काही वेळातच या अॅपने १२ कोटी डाऊनलोडचा आकडा पार केला आहे.

वाचाः whatsapp च्या कमाल ट्रिक्स, स्वतः बना ‘मेसेजिंग मास्टर’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमओच्या ट्विटमध्ये याचा वारंवार उल्लेख केला आहे. पीएमने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, मला विश्वास आहे की, तुम्ही आरोग्य सेतू अॅप संदर्भात ऐकले असेल. १२ कोटी आरोग्यासाठीच्या जागृतीसाठी लोकांना हे अॅप डाऊनलोड केले आहे. करोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत या अॅपची खू मोठी मदत मिळत आहे.

वाचाःचायनीज अॅप्सची सुट्टी करायचीय?, आत्ताच करा इन्स्टॉल

१३ दिवसात जोडले ५० मिलियन युजर्स

आरोग्य सेतू अॅप केवळ १३ दिवसात ५ कोटी नवीन युजर्स जोडले होते. सरकारने अनेक क्षेत्रात या अॅपचा वापर बंधनकारक केला आहे. अनेक कार्यालय, रेल्वे, विमान प्रवास या दरम्या हे अॅप बंधनकारक करण्यात आले आहे.

आरोग्य सेतू अॅपचा असा वापर करा

सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोर अॅपवरून हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. आरोग्य सेटू अॅप इन्स्टॉल केल्यानंतर पहिल्यादा त्याला ओपन करा. ज्या परवानगी (परमिशन्स) मागितल्या त्या देऊन टाका. मोबाइल नंबर, ब्लूटूथ आणि लोकेशन डेटाच्या मदतीने तुम्ही सुरक्षित आहात की नाही, किंवा संसर्गाचा धोका आहे का याची माहिती मिळते. आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यासाठी ब्लूटूथ आणि जीपीएस अॅक्सेस द्यावा लागतो. तुम्हाला मोबाइल नंबर नोंदणी करावा लागेल. या नंबरवर आलेला ओटीपीच्या मदतीने तुम्ही स्वतः व्हेरिफाय करु शकता.

अलर्ट करतो आरोग्य सेतू अॅप

तुम्हाला लोकेशन डिटेल्स आणि सोशल ग्राफसाठी आरोग्य सेतू अॅप सांगेल की, तुम्ही किती लो रिस्कवर किंवा हाय रिक्सवर आहात. जर तुम्ही हाय रिक्सवर असाल तर तुम्हाला हे अॅप अलर्ट करेल. चाचणी सेंटरला भेट देण्याची सूचनाही हे अॅप करेल.

वाचाःटाटा स्कायची सर्विस २ हजारांनी स्वस्त, ६ महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन

वाचाःबॅटरीतून निघाला धूर आणि जळायला लागला फोन

वाचाः फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोनमधून युजर्संची हेरगिरी, सरकारकडून वॉर्निंग

[ad_2]

Source link

Leave a comment