वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२२ मुदत वाढ बाबत…

विषय:- वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२२ बाबत…

संदर्भ :- १) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/आय.टी./२१-२२/२२३८ दिनांक

०१.०६.२०२२. २) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/ आय.टी./वनिप्र सूचना /२२-२३/२८५२ दिनांक १५.०६.२०२२.

उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ दिनांक ०१ जून २०२२ पासून राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन स्वरुपात यशस्वीरीत्या सुरु आहे. राज्यात एकूण ९४,५४१ प्रशिक्षणार्थ्यांनी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेली होती. यापैकी दिनांक १४.०७.२०२२ रोजी पर्यंत ५२,५५१ प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून उर्वरित प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. अशा उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांनी ●

आपले प्रशिक्षण दि. ३१ जुलै, २०२२ पूर्वी पूर्ण करावे.

तथापि ज्या प्रशिक्षाणार्थ्यांचे प्रशिक्षण त्यांच्या ईमेल मध्ये असणाऱ्या दुरुस्ती, प्रशिक्षण गट व प्रकार या मध्ये असणाऱ्या त्रुटी यामुळे उशिरा सुरु झाले आहे, अशा प्रशिक्षणार्थ्याना दुरुस्तीनंतर त्यांचे प्रशिक्षण

सुरु झालेल्या दिनांकापासून पुढील ४५ दिवसात आपले प्रशिक्षण पूर्ण करावे.

तसेच सर्व प्रशिक्षाणार्थ्यांना सूचित करण्यात येते की दि. २३ व २४ जुलै, २०२२ रोजी इन्फोसिस

स्प्रिंगबोर्ड मार्फत “सेवा अद्ययावतीकरण” या तांत्रिक कारणास्तव प्रशिक्षण प्रणाली बंद असणार आहे. या दोन दिवस कृपया प्रणालीचा वापर करू नये. दिनांक २५ जुलै,२०२२ पासून प्रणाली वापरासाठी नियमितपणे सुरु असेल, तरी याची नोंद घेण्यात यावी. सदर सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या

प्रशिक्षणार्थी यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच प्रशिक्षणाच्या सर्व अद्ययावत सूचना या https://training.scertimaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

E learning व्हिडिओ व माहिती पाहण्यासाठी युट्युब चैनल Subscribe करा

https://www.youtube.com/channel/UC4e3uqNb3fi5SVz4O-bxnDQ?sub_confirmation=1

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Telegram Group

https://t.me/ElearningAbhyas

Thank you🙏