पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

कृती- १ 1) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ‘झोपाळा गेला उडून’ या पाठाचे निरीक्षण करायला सांगावे. 

२) चित्रात काय काय दिसले? असे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांकडून चित्रातील तपशील मिळवावेत. 

3) विद्यार्थ्यांना गोष्ट माहिती आहे का? याची विचारणा करावी. 

४) विद्यार्थ्यांना चित्रांचा क्रम लक्षात घेऊन गोष्ट सांगायला लावावी.

सक्षम बनू या

कृती- १

१) मोठ्या आकारातील गोष्टीचे पान विद्यार्थ्यांसमोर धरावे. (टीव्हीवरही एकेक पान दाखवता येईल. कर्सरच्या मदतीने प्रत्येक शब्दावर संकेत करता येतील.)

२) चित्राचे निरीक्षण करत करत मजकूर बाचून दाखवावा. वाचताना प्रत्येक शब्दाखाली बोट

ठेवून वाचन करावे. कोणता शब्द कसा वाचायचा याची ओळख करून द्यावी.

३) उच्चार सुस्पष्ट आणि सर्वांना ऐकू जाईल असा करावा.

गोष्ट वाचून होताच त्यावर गप्पा माराव्यात.

+ सराव करू या.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना थोडक्यातु गोष्ट सांगावी.

+ कल्पक होऊ या

१) विद्यार्थ्यांना गोष्ट सांगण्याची संधी द्यावी.

२) गोष्टीतील मजा अनुभवण्याची संधी द्यावी.

३) विद्यार्थ्यांना स्वत:च्या मनाने गोष्ट सांगायची असेल तर तशी संधी द्यावी. विद्यार्थ्यांना अधिकाधिक बोलू द्यावे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी