♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस अठरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस अठरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

दिवस आठरावा

8 ने विभाज्य संख्या 8, 16, 24, 32, 40, 48, 56…

6 ने विभाज्य संख्या: 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54…

लघुत्तम सामाईक (साधारण) विभाज्य : लसावि

दिलेल्या संख्यांचा लसावि काढणे म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यांतील लहानात लहान

सामाईक विभाज्य संख्या शोधणे.

4 व 6 या संख्यांचा लसावि शोध.

4 ने विभाज्य संख्या: 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 40…

6 ने विभाज्य संख्या: 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54…

4 व 6 ने सामाईक विभाज्य : 12, 24, 36.

4 व 6 ने विभाज्य संख्यांच्या यादया पाहिल्या तर असे दिसते, की 12 ही सर्वांत लहान सामाईक विभाज्य संख्या आहे. म्हणून 4 व 6 चा लसावि 12 आहे.. PUNE

चला सराव करूया

13 व 6 चा लसावि काढ.

13 ने विभाज्य संख्या : 13, 26, 39, 52, 65, 78, 91, 104, 117, 130…

6 ने विभाज्य संख्या: 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54, 60, 66, 72, 78, 84..

13 व 6 ने सामाईक विभाज्य : 78

13 ने व 6 ने विभाज्य संख्यां च्या यादया पाहिल्या तर असे दिसते, की 78 ही सर्वांत लहान सामाईक विभाज्य संख्या आहे

म्हणून 13 व 6 चा लसावि 78 आहे.

एकाच प्रकारच्या 20 किंवा 25 बाटल्या मावतील अशी छोटी खोकी आहेत. एकच मोठा खोका पूर्णपणे भरण्यासाठी दोन्ही प्रकारच्या कमीत कमी किती बाटल्या लागतील ?

20 ने विभाज्य संख्या: 20, 40, 60, 80, 100, 120, 140… 25 ने विभाज्य संख्या: 25, 50, 75, 100, 125, 150…

20 व 25 ने सामाईक विभाज्य : 100

20 ने व 25 ने विभाज्य संख्यांच्या यादया पाहिल्या तर असे दिसते, की 100 ही सर्वांत लहान सामाईक विभाज्य संख्या आहे

म्हणून 20 व 25 चा लसावि 100 आहे.

म्हणून कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी 100 बाटल्या लागतील.

सोडवून पाहू

प्रश्न. दिलेल्या संख्यांचा लसावि शोध.

(1) 8, 20 (2) 2, 3, 5 (3) 12, 28 (4) 15, 201 (5) 8, 11 (6) 9, 15 (7) 11, 22 (8) 15, 45

खालील उदाहरणे वहीत सोडवा.

1) कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास, रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर त्या पटांगणावर कमीत कमी किती मुले आहेत ? 

2) वीणाजवळ काही मणी आहेत. तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 16, 24 किंवा 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही, तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत ? 

(3) तीन वेगवेगळ्या डब्यांत समान संख्येचे लाडू ठेवले. पहिल्या डब्यातील लाडू 20 मुलांना. दुसन्या डब्यातील लाडू 24 मुलांना व तिसन्या डब्यातील लाडू 12 मुलांना समान वाटले. एकही लाडू उरला नाही, तर तीनही डब्यात मिळून 

एकूण कमीत कमी किती लाडू होते ?

4) एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील तीन वेगवेगळ्या चौकांतील सिग्नल पाहिले. ते दर 60 सेकंद, 120 सेकंद व 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला, तेव्हा तीनही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने तीनही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील ?

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.