♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस अठरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस अठरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

अध्ययन निष्पत्ती- चौथी :- आपल्या कल्पकतेनुसार गोष्ट, कविता, वर्णन इत्यादी लिहिताना भाषेचा सर्जनशीलतेने वापर करतात.

पाचवी :- आपल्या कल्पनेने कथा, कविता, पत्र इत्यादी लिहितात. कथा, कविता यांमध्ये स्वतःच्या शब्दांची भर घालून लेखन करतात.

+ जाणून घेऊया

शिक्षकांनी इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 62 व 63 वरील पुढील चित्रांचे निरीक्षण विद्यार्थ्यांना करायला सांगावे व चित्रांच्या आधारे गोष्ट लिहिण्यास सांगावी. पुढील सूचना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावी. (चित्रे पहा व चित्रांच्या आधारे गोष्ट लिहा.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेली गोष्ट वाचावी व चित्रांच्या आधारे, चित्रांचे निरीक्षण करून, त्यात पडलेली घटना ओळखून तसेच चित्रांच्या वर्णनासाठी वाक्ये तयार करून विद्यार्थ्यांना घटनाक्रमद्वारे गोष्ट लिहिता येते की नाही हे पाहावे.

+ सक्षम बनू या

शिक्षक विद्यार्थ्यांना चित्रांच्या सहाय्याने गोष्ट कशी तयार करायची याबद्दल मार्गदर्शन करतील. 1 ) सुरुवातीला चित्रांचे बारकाईने निरीक्षण करावे.

2) पहिल्या चित्रापासून शेवटच्या चित्राचे क्रमाने निरीक्षण करत जावे. 3 ) क्रमाने निरीक्षण केल्यानंतर काय घटना घडली असेल? याचा बारकाईने विचार करावा.

4) काय घटना घडली? हे निश्चित झाल्यानंतर पहिल्या चित्राकडे जावे व बारकाईने निरीक्षण करावे.

5) प्रत्येक चित्राचे दोन ते तीन वाक्यांमध्ये वर्णन लिहावे.

6) चित्रांचे वर्णन करत असताना चित्रामध्ये काय दिसत आहे व चित्रामागे काय आहे हेही बारकाईने जाणून घेऊन वर्णन लिहावे.

7 ) चित्रात व्यक्ती, प्राणी, मुले दिसत असतील तर त्यांना तुमच्या आवडीची नावे द्यावीत.

8 ) गोष्ट प्रभावी होण्यासाठी काही संवादात्मक वाक्ये समाविष्ट करावीत व योग्य विरामाचिन्हे वापरावीत.

9 गोष्ट पूर्ण झाल्यावर गोष्टीला नाव द्यावे.

+ सराव करू या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील चित्रे दाखवावीत व चित्रांच्या आधारे गोष्ट लिहिण्यास सांगावी. पुढील प्रमाणे सूचना विद्यार्थ्यांना द्यावी.

(पुढे दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा व आत्ता सांगितलेल्या सूचनांप्रमाणे चित्रांच्या आधारे

गोष्ट तयार करून

ती लिहा. गोष्टीला नाव द्या.

कल्पक होऊ या

शिक्षकांनी विद्यार्थ्याना विद्यार्थ्यांनी नुकत्याच ऐकलेल्या/पाहिलेल्या/अनुभवलेल्या कोणत्याही एका घटनेबाबत घटनाक्रमानुसार क्रमाने विद्यार्थ्यांना येतील तशी चित्रे काढण्यास सांगावीत .चित्रांचे निरीक्षण करण्यास सर्व सांगावे व चित्रांच्या आधारे गोष्ट तयार करून ती लिहिण्यास व गोष्टीला नाव देण्यास सांगावे.

 विषय –  गणित 

थोडे आठवूया

हे उदाहरण बघूया

एका चौरसाकृती जागेचे कुंपण तारेच्या एका घेऱ्याने वाढवायचे आहे. कुंपणाची एक बाजू २० मीटर लांब असल्यास एकूण किती तार लागेल?

उत्तर शोधण्यासाठी सर्व बाजूंची बेरीज करावी लागेल. आपण शिकलो की चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. कुंपणाची एक बाजू २० मीटर म्हणजे इतर पण २० मीटर, म्हणजेच

२० मीटर + २० मीटर + २० मीटर + २० मीटर = ८० मीटर

८० मीटर तार लागेल.

येथे आपण चौरसाच्या सर्व बाजूंची बेरीज केली यालाच चौरसाची परिमिती म्हणतात.

* चौरसाची परिमिती म्हणजे चौरसाच्या सर्व बाजूंची बेरीज.

* आयताची परिमिती म्हणजे आयताची सर्व बाजूंची बेरीज.

 विषय –  इंग्रजी 

विषय -परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 18

समजून घेऊया स्थलांतर

संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 18, कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल

अध्ययन निष्पत्ती : 1) विस्तारीत कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध ओळखतात. 2) कुटुंबातील बदल (उदा. जन्म, लग्न, बदली इत्यादींमुळे होणारे बदल) स्पष्ट करतात.

सराव करू या :

प्र. 1) तुमच्या माहितीतील स्थलांतर करून आलेल्या कुटुंबाची खालील मुदयांनुसार माहिती मिळा

अ) त्या कुटूंबाचे मूळ गाव कोणते?

आ) कुटुंबाचे स्थलांतर करण्याचे कारण

इ) कुटुंबप्रमुखाचा व्यवसाय कोणता?

ई) ते कुटुंब स्थलांतर करून कधी आले ते वर्ष कोणते?

प्र. 2) स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांची माहिती मिळया व लिहा.

प्र. 3) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) स्थलांतर म्हणजे काय?

आ) तुमच्या मते पक्षी स्थलांतर का करत असतील?

इ) कुटुंबे लहान का का झाली? तुमच्या शब्दात लिहा.

 विषय –  परिसर अभ्यास  

पहिले काही आठवूया :

१ शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा कोठे केली होती?

२) शिवरायांनी राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली ?

३) राज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले?

राज्याभिषेक सोहळा :- हा पाठ्यांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग – २) या पाठ्यपुस्तकात पान क्र. ५७,५८ व ५९ वर आहे.

अधिकची माहिती येथून मिळेल https://tinyurl.com/y26k97ue

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१) शिवरायांचा राज्याभिषेक केव्हा झाला?

२) शिवरायांनी राज्यभिषेकापासून कोणता शक सुरु केला?

३) मासाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का वाहू लागले?