♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

सरल मध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन  2022-23  कसे करायचे  सोप्या पद्धतीने  मार्गदर्शन 

सरल मध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन  2022-23  कसे करायचे  सोप्या पद्धतीने  मार्गदर्शन 

नमस्कार मित्रांनो दरवर्षी आपण सरल मध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन करत असतो .  हे प्रमोशन केल्यामुळे सरल मध्ये आपले विद्यार्थी पुढील वर्गांमध्ये त्यांच्या माहितीसह  प्रमोट होत असतात. विद्यार्थी प्रमोशन करणे हे अतिशय आवश्यक आहे कारण हे प्रमोशन केल्याशिवाय आपल्याला विद्यार्थ्यांची ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवता येत नाही तसेच आलेली रिक्वेस्ट देखील अप्रूवल करता येत  नाही.  थोडक्यात प्रमोशन करणे हे सरल मधील पुढील काम करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे .  

 या ठिकाणी आपल्याला असे विद्यार्थी प्रमोशन कशाप्रकारे करायचे याचे मार्गदर्शन व्हिडिओसह करण्यात आलेले आहे तेव्हा ही माहिती सविस्तर पहा व व्हिडिओदेखील अवश्य पहा जेणेकरून आपल्याला विद्यार्थी प्रमोशन करताना कोणतीही अडचण येणार नाही . 

 स्टेप १ 

सर्वप्रथम आपल्याला आपल्या स्टुडन्ट डाटाबेस मध्ये लॉगिन करायचे आहे .

 स्टेप 2 

लॉग इन केल्यानंतर आपल्याला मेनूबार मध्ये प्रमोशनची टॅब दिसेल त्यामध्ये आपल्याला १  to 8 यावर क्लिक करायचे आहे . जर आपली यत्ता पुढील असेल तर आपण 9 and 11 यावर क्लिक करा . 

 स्टेप 3 

क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले मागील  वर्षीची इयत्ता व पट  दिसून येईल त्या   पटसंख्यावर  क्लीक करायचे आहे 

 स्टेप 4 

यानंतर आपल्याला खाली आपले सर्व विद्यार्थ्यांची नावे दिसून येतील या विद्यार्थ्यांच्या नावाखाली Promote  ही टॅब असेल  त्यावर क्लिक केल्यानंतर आपले सर्व विद्यार्थी हे पुढील भागांमध्ये Promote होतील.

 अशाप्रकारे सोप्या पद्धतीने आपण आपल्या वर्गाचे शाळेचे प्रमोशन करू शकता.

 याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी खालील व्हिडिओ अवश्य पहा

सेतू अभ्यास नियमित व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा👇
https://sandeepwaghmore.in/aajcha-abhyas-information