[ad_1]
ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या गॅलेक्सी ए३१ साठी बनवण्यात आलेल्या मायक्रोसाईट लिंक सुद्धा शेअर केली आहे. या पेजवर ‘Notify Me’ चे बटन दिले आहे. ज्यावर क्लिक केल्यानंतर इच्छूक युजर्संला अपडेट्ससाठी रजिस्टर करु शकता. मायक्रोसाईटवर सॅमसंग गॅलेक्सी ए३१ काही वैशिष्ट्यांसह खुलासा केला आहे. यानुसार, हँडसेट मध्ये ४८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा असणार आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा सेन्सर, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर मिळणार आहे.
मायक्रोसाईटच्या माहितीनुसार, गॅलेक्सी ए३१ मध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड इनफिनिटी यू स्क्रीन असणार आहे. या पेजच्या माहीतीनुसार, गॅलेक्सी ए३१ मध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच १५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
वाचाःटाटा स्कायची सर्विस २ हजारांनी स्वस्त, ६ महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन
सॅमसंग गॅलेक्सी ए ३१ ला कंपनीने आधीच्या गॅलेक्सी ए ३० चे अपग्रेडेट व्हेरियंट असणार आहे. गॅलेक्सी ए ३० ला गेल्या वर्षी फेब्रुवारीत लाँच केले होते. या फोनमध्ये दोन रियर कॅमेरे दिले होते. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ५ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड ९.० ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. हँडसेटमध्ये १.८ गीगाहर्ट्ज एक्सीनॉस ७९०४ ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे. डिव्हाईसला पॉवर देण्यासाठी यूएसबी टाईप सी फास्ट चार्जिंग सोबत ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.
वाचाःबॅटरीतून निघाला धूर आणि जळायला लागला फोन
वाचाः फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोनमधून युजर्संची हेरगिरी, सरकारकडून वॉर्निंग
[ad_2]
Source link