[ad_1]
DailyMail च्या रिपोर्टनुसार, कॅलिफॉर्निया येथील रहिवासी यानासेने या संदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत फटाके फुटल्याप्रमाणे आवाज येत आहे. तसेच फोनला आग लागल्याने फोन यात जळून खाक झाला आहे. युजरने एक व्हिडिओ बनवला आहे. चार वर्षाआधी Galaxy Note 7 डिव्हाईसमध्ये स्फोट झालेल्या व्हिडिओसारखाच हा व्हिडिओ असल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्मार्टफोन नोट ७ मध्ये काही तरी कमतरता असल्याचे बोलले जात आहे. स्फोटाचे नेमके कारण, अद्याप समोर आले नाही.
सॅमसंगने दिला विश्वास
युजरने म्हटले, माझ्या फोनची स्क्रीन खराब झाली होती. त्यामुळे मी फोनला बॅक पॅनलवरून ओपन केले. त्यात पाहणे सुरु केले. माझ्या हातात फोन होता. त्याचवेळी फोनच्या बॅटरीत स्पार्किंग सुरू झाली. फटाक्याप्रमाणे स्पार्किंग झाल्यानंतर फोन जळायला लागला. डेली मेलने सॅमसंगशी संपर्क केला. तसेच कंपनीकडून पब्लिक स्टेटमेंट सुद्धा जारी केले. सॅमसंगने सांगितले की, गॅलेक्सी ए सीरिज स्मार्टफोनची क्वॉलिटी आणि युजर्सच्या सुरक्षेवर आम्ही विश्वास ठेवतो. आम्ही युजर्सशी संपर्क केला आहे. डिव्हाईनस परत घेऊन त्यानंतर पुढील तपास करण्यात येईल, असे सॅमसंगने म्हटले आहे.
samsung user
बॅटरीची लाईफ असू शकते कारण
यानासे ने सांगितले होते की, फोनची स्क्रीन खराब झाली होती. फोन हातात होता. बॅटरीत स्पार्किंग झाल्याने या फोनला आग लागली. मी फोनला किचनच्या पॅनवर ठेवले होते. डॉग बाऊसमधून यावर पाणी फेकले परंतु, त्याची आग सुरूच होती. त्यामुळे मला पॅन बाहेर घेऊन जावे लागले. माझे संपूर्ण घरात धूर पसरला होता. तसेच वेगळाच वास येत होता. फोनची बॅटरी याला कारण असू शकते. कारण मदरबोर्डवर काहीही डॅमेज दिसले नाही. कंपनीने युजरच्या तक्रारीवर कारवाई करायला सुरुवात केली आहे.
वाचाः फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोनमधून युजर्संची हेरगिरी, सरकारकडून वॉर्निंग
[ad_2]
Source link