♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

reliance jio vs airtel vs vodafone: सर्वात स्वस्त रिचार्जः १ वर्षासाठी डेटा – फ्री कॉलिंग – reliance jio vs airtel vs vodafone cheapest prepaid plan with 1 year validity

[ad_1]

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आपल्या युजर्संसाठी एक वर्षभराची वैधता असलेले अनेक प्लान ऑफर करीत आहे. वर्षभर वैधता असलेल्या प्लानचा फायदा म्हणजे, युजर्संना वारंवार रिचार्ज करावा लागत नाही. तसेच दर महिन्याला रिचार्ज करण्यापेक्षा हा रिचार्ज स्वस्त पडतो. त्यामुळे या तिन्ही कंपन्यांचे एक वर्षाचे प्रीपेड प्लानविषयी माहिती जाणून घ्या जे की, सर्वात स्वस्त प्लान आहेत.

वाचाःफेसबुकवर अशा जाहिरातींना चुकूनही क्लिक करू नका


Airtel चा १४९८ रुपयांचा प्लान

एअरटेलचे वर्षभराची वैधता असलेले प्लान अनेक आहेत. परंतु, यातील सर्वात स्वस्त प्लान हा १४९८ रुपयांचा आहे. यात ३६५ दिवसांची वैधता मिळते. युजर्संना २४ जीबी डेटा मिळतो. त्यामुळे महिन्याला २ जीबी डेटा मिळतो असे समजा. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि ३६०० एसएमएस मिळतात.

Vodafone चा १४९९ रुपयांचा प्लान

व्होडाफोन आणि एअरटेलच्या प्लानमध्ये फारेस अंतर नाही. ३६५ दिवसांची वैधता असलेला हा प्लान सर्वात स्वस्त प्लान आहे. यात २४ जीबी डेटा मिळतो, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि ३६०० एसएमएस मिळतात. तसेच या शिवाय या प्लानमध्ये युजर्संना व्होडाफोन प्ले आणि झी ५ अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाः नोकियाने आणला जबरदस्त स्मार्ट टीव्ही, पाहा किंमत

Jio चा १२९९ रुपयांचा प्लान

रिलायन्स जिओचा हा प्लान पूर्ण वर्षभरासाठी नाही. परंतु, यात ग्राहकांना ११ महिन्यांपर्यंत वैधता मिळते. जिओचा हा प्लान ३३६ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. यात जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १२००० नॉन जिओ मिनिट्स दिले जातात.

वाचाःMitron युजर्संना इशारा, तात्काळ डिलीट करा अॅप

वाचाः ‘मेड इन चायना’ फोन खरेदी करायचा नाही?, हे ‘टॉप १०’ ऑप्शन आहेत बेस्ट

वाचाः ५ मिनिटात विकले गेले १०० कोटी रुपयांहून अधिक फोन

[ad_2]

Source link