[ad_1]
MyGov Indiaचे सीईओ अभिषेक सिंह यांनी एका मुलाखतीत सांगितले की, भारत सरकार जिओफोन युजर्संसाठी एक वेगळा आरोग्य सेतू मोबाइल अॅप तयार करीत आहे. हा मोबाइल अॅप केएआयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. रिलायन्स जिओचे सर्व जिओफोन या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. भारतात सध्या ४० ते ५० कोटी पर्यंत स्मार्टफोन युजर्स आहेत. तसेच देशात फीचर फोन युजर्संची संख्याही कमी नाही. ११ कोटी जिओफोन युजर्स आहेत. त्यामुळे या लोकांना आरोग्य सेतू मोबाइल अॅपशी जोडणे खूप गरजेचे आहे. करोना व्हायरसला ट्रॅक करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच जिओफोन युजर्ससाठी आरोग्य सेतू मोबाइल अॅप लाँच करणार आहे. या लाँचिंगची तारीख मात्र उघड केली नाही.
वाचाः करोनाः पुणे आणि कटकच्या ITI ने करून दाखवले
आरोग्य सेतू IVRS सेवा लाँच
भारत सरकारने बुधवारी फीचर फोन आणि लँडलाइन युजर्ससाठी आरोग्य सेतू IVRS सेवा लाँच केली आहे. या सेवे अंतर्गत फीचर फोन आणि लँडलाइन युजर्संसाठी १९२१ टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन यासंबंधीची माहिती मिळवता येऊ शकते. विशेष म्हणजे ही सेवा ११ भाषांना सपोर्ट करते.
आरोग्य सेतू अॅप हिंदी, इंग्रजी आणि मराठी सह ११ भाषेत उपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमातून करोना व्हायरस रोखण्यास मदत मिळते. गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करण्यात आल्यानंतर नाव आणि मोबाइल नंबर नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर भाषा निवडायची आहे. त्यानंतर करोनाचा संसर्ग झालेला व्यक्ती तुमच्या आजुबाजुला आहे की, नाही, हे अॅपवरून कळणार आहे.
[ad_2]
Source link