इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 39
विषय – गणित
आव्हानात्मक कोपरा :
उदा. 1) शाळेमध्ये एका विद्यार्थ्याला 11 किग्रॅ 400 ग्रॅ तांदूळ शासनाकडून मिळत असेल, तर 17 विद्यार्थ्यांचा किती तांदूळ शाळेला मिळेल?
उदा. 2) विजयने 912 रुपये 50 पैसे यामधून 680 रुपये 90 पैसे औषधोपचारासाठी खर्च केले, तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले?
उदा. 3) एका शेतकऱ्याच्या म्हशी एका दिवसाला सकाळी 63 ली 340 मिली व संध्याकाळी 51 ली 870 मिली दुध देतात, तर एका दिवसाला किती लीटर दूध देतात?
उदा. 4) 7 मी लांबीचा एक खांब तयार करण्यासाठी 1 पोते सिमेंट लागते, तर 266 सिमेंटच्या पोत्यात किती खांब तयार होतील?