[ad_1]
या सारखी एक खोटी माहितीची लिंक व्हायरल होत आहे. COVID-19 म्हणजेच करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतातील लोक घरात राहतील आणि त्यांना १६ मार्च २०२० पासून दर आठवड्याला ७००० रुपये मिळणार आहे. सरकारकडून मिळणारी ही रक्कम सर्वांना मिळणार आहे. जर तुम्ही कोणतेही काम करणार असाल तरीही सरकारकडून तुम्हाला ही रक्कम मिळेल, असा दावा यातून करण्यात आला आहे. या रकमेसाठी दावा करण्यासाठी संपूर्ण बातमी या ठिकाणी वाचा…मेसेससोबत दिलेली लिंक ‘https://timesofindia.indiatimes.com’ अशी सुरू होते. त्यामुळे ही माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिलीय, असा भास होतो.

आणखी एक खोटा मेसेज असून त्यात लिहिलेय, की ब्रेकिंग न्यूज करोना व्हायरसला नियंत्रित करण्यासाठी मोदी सरकारने पेड लिव, फ्री खाणे-पिणे, प्रत्येक व्यक्तीला ३५ हजार रुपये, इन्कम टॅक्स आणि ईएमआय मधून सूट देण्यासाठी पावलं उचलली आहेत. हा मेसेज सुद्धा अशाच लिंकसोबत शेअर केला जात आहे. जो टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीसारखा वाटतो.

या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजर्संना कॉमेडियन कपिल शर्माचा फोटो दिसतो.
खरं काय आहे?
TOI.in चा या खोट्या मेसेजशी काहीही देणे-घेणे नाही.
हे दोन्ही मेजेस खोटी बातमी पसरवण्यासाठी शेअर केले आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक टाइम्स ऑफ इंडियांची बातमी सारखी दिसण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने या खोट्या बातमी पसरवण्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे ठरवले आहे. कारवाई सुरू केली आहे.
आम्ही वाचकांना विनंती करतो की, या सारख्या मेसेजसना फॉरवर्ड करू नका. कारण, चुकीची माहिती पसरवली म्हणून तुमच्यावर ठपका ठेवला जावू शकतो तसेच पोलीस तुमच्याविरुद्ध कधीही कारवाई करू शकतात.
[ad_2]
Source link
Rất phù hợp với người mới bắt đầu như mình.
Trang web https://co88.org/ lừa đảo, nội dung đồi trụy
https://co88.org Lừa đảo nội dung đồi trụy