fact check – in viral video spit on police in police van who is related with tablighi cast or not

[ad_1]

मुंबई : तबलीगी समाजाच्या काही लोकांनी मार्च महिन्यात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यानंतर हे लोक आपआपल्या इच्छीत स्थळी गेले. यातील काही लोकांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत २५ टक्के रूग्णांची वाढ झाल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयान केला आहे.

दुसरीकडे एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यासोबत काही दावे देखील केले जात आहेत.

यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तबलीगी समाजातील लोकांना पोलिसांवर थुंकलंय, आणि तो कोरोनाग्रस्त होता, त्याच्याकडून कोरोना पसरवण्यासाठी हा प्रयत्न आहे, असा दावा देखील या व्हिडीओसोबत केला जात आहे.

एका ट्ववीटर युझरने देखील असाच व्हिडीओ पोस्ट केला आहे, तसेच खातरजमा करण्यासाठी हा व्हिडीओ पाहा, असा दावा केला आहे.

एका पोलिसांच्या व्हॅनमध्ये ज्या व्हॅनला अनेक लोक पिंजरा गाडी म्हणतात. यात एका आरोपीला पोलीस घेऊन जात आहेत. हा आरोपी एका पोलिसावर थुंकतो. पोलिसांना हे असह्य झाल्यानंतर पोलीस कर्मचारी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, धक्काबुक्की करतात, असं या व्हिडीओत दिसून येतं.

वरील व्हिडीओचा संदर्भ हा तबलिगी समाजाशी जोडला जात आहे. व्हिडीओत जो दावा केला जात आहे, तो किती खरा आहे, याची पडताळणी आम्ही केली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ २ मार्च २०२० च्या आधीच पोस्ट केलेला आहे. अनेक सोशल मीडिया साईटसवर हा संपूर्ण व्हिडीओ आहे, पण हा तबलिगी समाजाचा व्यक्ती आहे, कोरोनाबाधित आहे, आणि तो पोलिसांवर थुंकत आहे, असा दावा करताना, तो फक्त २७ सेकंदाचा दाखवण्यात आला आहे.

कोणत्याही कोरोना बाधिताला पोलीस व्हॅनमध्ये घेऊन जात नाहीत. हा व्हिडीओ एका अंडरट्रायल कैद्याचा आहे. या कैद्याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. तसेच हा व्हिडीओ सर्वात आधी जेव्हा सोशल मीडियावर पोस्ट झाला, तेव्हा मुंबईत कोरोना बाधित नव्हते.

या कैद्याने पोलिसांवर थुंकलंय हे सत्य आहे. पण तो कोरोना बाधित किंवा तबलिगी समाजाचा नाही, हे देखील स्पष्ट होत आहे. गुगल रिव्हर्स इमेजमध्ये देखील हा व्हिडीओ टाईम्स ऑफ इंडियाने २ मार्च २०२० रोजी पोस्ट केल्याचं स्पष्ट होत आहे, त्यावरून कोरोना प्रकरणाशी या व्हिडीओचा काहीही संबंध नाही.

या कैद्याला जेव्हा ताब्यात घेण्यात आलं, तेव्हा त्याच्या घरच्या जेवणाचा डबा त्याला देण्यात न आल्याने तो नाराज होता, त्यावरून त्याने पोलिसांशी हु्ज्जत घातली. पोलिसांनीही त्याला खूप सहन केल्याचं व्हिडीओत दिसतंय, पण जेव्हा तो पोलिसांवर थुंकतो, तेव्हा पोलिसांना ते असह्य होतं, आणि पोलीस मिळून त्याला लाथा बुक्यांचा प्रसाद देत आहेत.



[ad_2]

Source link

Leave a comment