♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 36

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस 36

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 


कृतिपत्रिका : 19

चला समजून घेऊया टूथपेस्ट, अपमार्जके, सिमेंट संदर्भ इयत्ता 7 वी प्रकरण 15 पदार्थ आपल्या वापरातील

अध्ययन निष्पत्ती : शास्त्रीय संकल्पनांचे दैनंदिन जीवनात उपयोजन करतात, प्रदूषित पाण्याच्या पुनर्वापरासाठी योग्य त्या पद्धती सुचवणे, साबण निर्मिती व उपयोग, मिश्रणातील घटक वेगळे करणे इत्यादी. लक्षात घेऊया :

टूथपेस्ट कॅल्शिअम कार्बोनेट, कॅल्शिअम हायड्रोजन, फॉस्फेट हे टूथपेस्टमधील प्रमुख घटक दातांवरील घाण दूर करतात. दातांना पॉलिश करण्याचे काम या घटकांमुळेच होते. दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये असणाऱ्या ठरावीक प्रमाणातील फ्लोराइडचा उपयोग होतो. हे फ्लोराइड दातांवरील आवरण (Enamel) आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असते.

अपमार्जके स्वच्छ करणारा, मळ काढून टाकणारा पदार्थ म्हणजे अपमार्जक रिठा, शिकेकाई, साबण, कपडे धुण्याचा सोडा, कपडे धुण्याची पावडर, लिक्विड सोप, शँपू ही सर्व अपमार्जकेच होत.

अपमार्जन क्रिया : अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात. अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू, तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात. कपड्यांमधील उभ्या-आडव्या धाग्यांमध्ये तेलकट थर घट्ट चिकटून बसतो. तो काढण्यासाठी साबण वापरतात. पाणी व तेल दोघांनाही पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे सायण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागांपर सहज पसरते. पृष्ठभागावर पसरण्याच्या या गुणधर्माला पृष्ठसक्रियता म्हणतात. अपमार्जके पृष्ठसक्रिय (Surface active) असतात. पृष्ठसक्रियतेचा एक परिणाम म्हणजे फेस होणे.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment