♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 33

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस 33

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 

कृतिपत्रिका : 16

समजून घेऊ या नैसर्गिक बदल, उपयुक्त व हानिकारक बदल, शीघ्र व सावकाश बदल, परिवर्तनीय व अपरिवर्तनीय : बदल, आवर्ती व अनावर्ती बदल, भौतिक व रासायनिक संदर्भ: इयत्ता 7 वी प्रकरण 13 बदल: भौतिक व रासायनिक अध्ययन निष्पत्ती: गुणधर्म, लक्षणांच्या आधारे पदार्थ व सजीवांचे वर्गीकरण करतात उदाहरणार्थ वनस्पतीजन्य व प्राणीजन्य तंतू, भौतिक व रासायनिक बदल इत्यादी

लक्षात घेऊ या:

नैसर्गिक बदल : जे बदल निसर्गतःच घडून येतात. त्यांना नैसर्गिक बदल असे म्हणतात. उदाहरणे: फळ पिकणे, दूध नासणे, क्षरण

उपयुक्त बदल जे बदल आपल्याला उपयोगी असतात, त्या बदलांना उपयुक्त बदल असे म्हणतात. उदाहरणे अन्न शिजवणे, दुधाचे दही होणे.

हानिकारक बदल : उपयुक्त नसणाऱ्या किंवा मानवास हानी पोहचवणाऱ्या बदलांना हानिकारक बदल म्हणतात. उदाहरणे : वादळात उन्मळून पडलेले झाड, लोखंड गंजणे

शीघ्र बदल जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागती त्यास शीघ्र होणारे बदल म्हणतात. उदाहरणे फुगा फुटणे, बर्फ वितळणे

सावकाश होणारे बदल जे बदल घडून येण्यासाठी जास्त कालावधी लागतो. त्यास सावकाश होणारे बदल म्हणतात.

उदाहरणे फळ पिकणे, लोखंड गंजणे

परिवर्तनीय बदल पुन्हा पुन्हा उलट सुलट कमाने होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल म्हणतात.

उदाहरणे मेण वितळवून पुन्हा मेण मिळवणे, बर्फ वितळणे.

अपरिवर्तनीय बदल पुन्हा उलट क्रमाने न होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल म्हणतात. उदाहरणे दुधाचे दही होणे, लाकूड जाळले की राखेपासून पुन्हा लाकूड मिळत

आवर्ती बदल जे बदल ठरावीक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. अशा बदलांना आवर्ती बदल म्हणतात. उदाहरणे समुद्रातील भरती-ओहोटी, दिवस – रात्र, ऋतुबदल

अनावर्ती बदल एखादा बदल घडल्या वर तो पुन्हा कधी होईल हे निश्चित ता येत नाही. तो झालाच तर त्या दोन्हींमधील कालावधी एकसारखा नसतो. अशा बदलांना अनावर्ती बदल म्हणतात. उदाहरणे पूर येणे, झाडावर बसलेला पक्षी उडून जाणे.

भौतिक बदल जे बदल घडताना मूळ पदार्थाचे गुणधर्म आहे तसेच राहतात, त्यांचे संघटन कायम राहते. कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. अशा बदलास भौतिक बदल असे म्हणतात.

उदाहरणे- बर्फ वितळणे, लाकडापासून टेबल बनवणे, काचेची वस्तू फुटणे. रासायनिक बदल जे बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होते अशा बदलास रासायनिक बदल असे म्हणतात. उदाहरणे टोमॅटो पिकणे, लोखंड गंजणे

सावकाश, रासायनिक, हानिकारक बदल

रासायनिक, सावकाश, उपयुक्त, अपरिवर्तनीय भौतिक, शीघ्र, परिवर्तनीय बदल नैसर्गिक बदल

क्षरण : धातूंवर ओलाव्यामुळे हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची वाफ या सारख्या वायूंची प्रक्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात. या प्रक्रियेमुळे धातूंवर परिणाम होऊन ते झिजतात. यालाच क्षरण असे म्हणतात.

उदाहरणे: लोखंडाची वस्तू गंजते म्हणजे त्यावर विटकरी रंगाचा थर साचती, तांब्याच्या वस्तूवर हिरवट रंगाचा थर तयार होतो.

क्षरण प्रतिबंध :

गंजलेले लोखंडी वस्तू

हिरवे पडलेले तांब्याचे नाणे

1) धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यांच्यावर तेल, ग्रीस, वारनिश, व रंगाचे थर दिले जाते. 2) गॅल्व्हनायझेशन – लोखंडी वस्तूंवर जस्ताचा पातळ लेप लावतात.

3) कल्हई तांब्या पितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप देतात.

सराव करू या :

  1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

i) सहसंबंध पूर्ण करा.

गॅल्व्हनायझेशन : जस्ताचा लेप : कल्हई :

(ii) वेगळा कोण ते ओळखा.

पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण, पूर येणे, समुद्रातील भरती-ओहोटी, ऋतुबदल,



5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी